राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत असणारा 'हा' उमेदवार देणार काँग्रेसलाच टक्कर

लक्षद्वीप बेटांचा समावेश असलेला हा मतदारसंघ मुस्लीमबहुल आहे. तारिक अन्वर यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर राष्ट्रवादीचे महाराष्ट्राबाहेरचे एकमेव खासदारही तेच ठरले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Mar 16, 2019 06:50 PM IST

राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत असणारा 'हा' उमेदवार देणार काँग्रेसलाच टक्कर

मुंबई, 15 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी (14 मार्च)जाहीर केली. या यादीत गेल्या निवडणुकीत यश मिळवणारे बहुतेक सगळे विद्यमान खासदार आहेत. एकूण 12 जणांच्या या यादीत महाराष्ट्राबाहेरचा एक उमेदवार आहे. लक्षद्वीप मतदारसंघातून मोहम्मद फैजल यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. तारिक अन्वर यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर मोहम्मद फैजल हे राष्ट्रवादीचे महाराष्ट्राबाहेरचे एकमेव खासदार ठरले आहेत.

आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठीसुद्धा राष्ट्रवादीने फैजल यांची उमेदवारी घोषित केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिल्या यादीतल्या उमेदवारांची घोषणा केली, त्यात राज्याबाहेरचं फैजल यांचं एकमेव नाव होतं. मोहम्मद फैजल लक्षद्वीपमधून पहिल्यांदाच निवडून आले आहेत. 2014च्या मोदी लाटेतही ते निवडून आले हे विशेष.


संबंधित बातम्या

BLOG : शरद पवार : जाणता राजा की राजकारणातील हिचकॉक?


सुजय विखेंबद्दल अजित पवारांनी केला हा मोठा गौप्यस्फोट!


VIDEO : राष्ट्रवादीकडून 'सुपर 5' उमेदवार मैदानात, UNCUT पत्रकार परिषद

लक्षद्वीप बेटांचा समावेश असलेला हा मतदारसंघ मुस्लीमबहुल आहे. गेली कित्येक वर्षं या मतदारसंघावर काँग्रेसची मजबूत पकड होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. एम. सईद यांचा हा मतदारसंघ. सईद या जागेवरून सलग 10 वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. 2004 मध्ये पहिल्यांदाच त्यांच्या विजयरथाला संयुक्त जनता दलाच्या उमेदवाराने रोखलं. त्यानंतर सईद यांचं 2005 मध्ये निधन झालं आणि लक्षद्वीपची जागा 2009 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सईद यांचे पुत्र मोहम्मद हमीदुल्ला सईद यांनी लढवली आणि जिंकलीही. ते त्यावेळचे सर्वात तरुण खासदार ठरले होते. पण हमीदुल्ला सईद आणि काँग्रेसच्या वर्चस्वाला गेल्या निवडणुकीत शह दिला तो मोहम्मद फैजल यांनी.


मोहम्मद फैजल हे लक्षद्वीप भागातले सध्या लोकप्रिय राजकारणी समजले जातात. राष्ट्रवादीचे असूनदेखील त्यांनी मध्यंतरी एका कार्यक्रमात मोदी सरकारच्या विकास कामांचं कौतुक केलं होतं. या सरकारच्या काळात लक्षद्वीपसारख्या केंद्रशासित प्रदेशात बराच विकास झाल्याचं ते म्हणाले होते. त्यांच्या त्या वक्तव्याची विशेष दखल घेण्यात आली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रादेशिक पक्ष असला, तरी शरद पवारांच्या या पक्षाची व्याप्ती राज्याबाहेरही आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात 5 आणि राज्याबाहेरचे 2 धरून राष्ट्रवादीचे केवळ 7 खासदार निवडून आले होते. त्यातल्या तारिक अन्वर यांनीसुद्धा आता पक्ष सोडला आहे. त्यामुळे सध्या लोकसभेतलं राष्ट्रवादीचं संख्याबळ फक्त 6 आहे.


VIDEO : अजित पवारांची सुजय विखेंवर 'या' शब्दांत टीका


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2019 06:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close