S M L

खडसेंच्या रावेरमध्ये भाजपविरोधात शिवसैनिक आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

Updated On: Mar 21, 2019 02:14 PM IST

खडसेंच्या रावेरमध्ये भाजपविरोधात शिवसैनिक आक्रमक

जळगाव, 21 मार्च : भाजपचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेतील संघर्ष नवा नाही. अशातच आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. कारण रावेर मतदारसंघ शिवसेनेला मिळावा, यासाठी शिवसैनिक आक्रमक झाले असून ते शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

सध्या रावेरमधून एकनाथ खडसे यांच्या सूनबाई या खासदार आहेत. रावेर लोकसभा मतदार संघात भाजपने शिवसेनेला नेहमीच डावललं आहे, असा शिवसैनिकांचा आरोप आहे. त्यामुळे आता राज्यात शिवसेना भाजप-युती झाली असताना या मतदारसंघातील शिवसैनिकांत खदखद वाढलेली आहे.

एकनाथ खडसे यांच्या परिवारातील उमेदवार असल्यास शिवसेना युतीचे काम करणार नाही किंवा ही जागा वाटाघाटीत शिवसेनेला घ्या, असा पवित्रा शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी घेतला आहे.


रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व शिवसैनिक मुक्ताईनगर येथील शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांतभाऊ पाटील यांचे निवासस्थान असलेल्या शिवनेरी बंगल्यावर प्रचंड ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती आहे.

माढ्यामध्ये राष्ट्रवादीची उमेदवारी कुणाला? अजित पवार म्हणतात...

ष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून या मतदारसंघात आता नेमकी कुणाला उमेदवारी दिली जाणार, याची जोरदार चर्चा आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत भाष्य केलं आहे.

Loading...

पवार साहेबांनी आणि राष्ट्रवादीने माढ्यातून विजयसिंह यांना तुम्ही लढा असं सांगितलं होतं. पण त्यांनी दुसरंच नाव दिलं. त्या नावाला माळशिरस वगळता माण-खटाव, फलटण सगळीकडून विरोध होता. नंतर त्यांनी फोनच बंद करून ठेवला होता. आता आम्ही माढ्यामध्ये नवीन तरुण उमेदवार देणार आहोत,' असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार यांनी केलेल्या या विधानानंतर माढ्यातून राष्ट्रवादी नक्की कुणाला तिकीट देणार, याबाबत अंदाज बांधण्यात येत आहेत. सध्या तरी राष्ट्रवादीकडून संजय शिंदे आणि प्रभाकर देशमुख यांचं नाव चर्चेत आहे.


SPECIAL REPORT : माढ्यानंतर शरद पवारांचा 'प्लॅन B'!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2019 02:14 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

But the job is not done yet!
vote for the deserving condidate
this year

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close