News18 Lokmat

संजय काकडे भाजपमध्येच; मुख्यमंत्री मनधरणी करण्यात यशस्वी

संजय काकडेंचं मन परिवर्तन करण्यास मुख्यमंत्र्यांना यश आल्याने राष्ट्रवादीच्या मनसुब्यांवर पाणी फिरणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2019 03:13 PM IST

संजय काकडे भाजपमध्येच; मुख्यमंत्री मनधरणी करण्यात यशस्वी

मुबंई 22 मार्च :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असलेले राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी भाजपमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. आता भाजपमध्ये राहून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं संजय काकडे यांनी म्हटलं आहे. शिवाय, काकडे यांनी पश्चिम महाराष्ट्रात भाजपसाठी काम करणार असल्याचं न्यूज18 लोकमतकडे बोलताना स्पष्ट केलं आहे. दरम्यान, वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या भाजपच्या कार्यक्रमाला देखील संजय काकडे हजर होते.


भाजपने गुरुवारी देशातल्या 182 लोकसभा उमेदवारांची घोषणा केली त्यात महाराष्ट्रातल्या 16 जागांचा समावेश आहे. त्यात दोन नवे चेहेरे असून बाकी 14 जणांना पुन्हा तिकीट देण्यात आलंय.


 महाराष्ट्रातील भाजपचे उमेदवार

Loading...

नागपूर - नितीन गडकरी, धुळे- सुभाष भांबरे, वर्धा - रामदास तडस, नंदूरबार - हीना कुमार गावित, रावेल - रक्षा खडसे , अकोला - संजय धोत्रे, गडचिरोली - अशोक महादेवराव नेते, चंद्रपूर - हंसराज गंगाराम अहीर, जालना - रावसाहेब दानवे, भिंवडी - कपिल पाटील, मुंबई नॉर्थ - गोपाल शेट्टी, मुंबई नॉर्थ सेंट्रल - पूनम महाजन,अहमदनगर - सुजय विखे पाटील  बीड - डॉ. प्रीतम मुंडे, लातूर - सुधाकरराव भालेराव श्रृंगारे, सांगली - संजयकाका पाटील


दोन नवे चेहेरे


काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले सुजय विखे पाटील यांना भाजपने नगरमधून उमेदवारी दिलीय. नगरचे सध्याचे खासदार दिलीप गांधी हे सलग तीन वेळा निवडून आले होते मात्र नव्या समिकरणांमुळे त्यांना बाजूला सारत भाजपने सुजय विखेंची निवड केलीय.


तर लातूरमध्ये विद्यमान खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्याबद्दल कार्यकर्ते आणि नागरिकांमध्येही नाराजी होती. त्यामुळ त्यांना तिकीट नाकारण्यात आलंय. तिथून जिल्हा परिषदचे सदस्य सुधाकर श्रृंगारे यांना भाजपने तिकीट दिलंय. श्रृगांरे यांनी गेली काही वर्ष या मतदारसंघात जनसंपर्क ठेवला होता. त्यामुळे त्यांच्या पारड्यात आपलं वजन टाकलं आहे.


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 22, 2019 03:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...