BREAKING भाजपने उमेदवारी दिली तर माढ्यातून लढणार - मोहिते पाटील

BREAKING भाजपने उमेदवारी दिली तर माढ्यातून लढणार - मोहिते पाटील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयसिंह मोहिते यांचं मन वळविण्यात यश मिळवल्याने राष्ट्रवादीलाही धक्का बसण्याची शक्यता आहे.

  • Share this:

सागर सुरवसे, अकलूज 27 मार्च : माढा लोकसभा मतदारसंघातला सस्पेन्स आणखी वाढला आहे. या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कोण असेल अशी चर्चा सुरू आहे, पण नाव घोषीत होत नव्हतं. विजयसिंह आणि रणजितसिंह मोहिते हे निवडणूक लढविण्यास इच्छुक नाहीत असं म्हटलं जात होतं. मात्र विजयसिंह मोहिते पाटील यांनी आज निवडणूक लढण्याचे संकेत दिले.

माढ्यात बोलताना विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले की, पक्षाने तिकीट दिलं तर मी निवडणूक लढवायला तयार आहे. राष्ट्रवादीने माढ्यातून संजयमामा शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते. राष्ट्रवादीने त्यांना पुन्हा आपल्या जाळ्यात ओढलं.

त्यामुळे भाजपचा उमेदवार कोण असेल याची सगळ्यांना उत्सुकता होती. विजयसिंह मोहिते पाटील हे फारसे उत्सुक नव्हते, तर रणजितसिंह यांनाही निवडणूक लढवायची नव्हती. सहकारमंत्री सुभाष देशमुख किंवा त्यांचा मुलगा रोहन याला भाजप मैदानात उतरवू शकते असं म्हटलं जात होतं.

माढा जिंकायचा असेल तर मोहिते घाराण्यातल्या व्यक्तिलाच तिकीट दिलं पाहिजे अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. तर मुख्यमंत्रीही विजयसिंह मोहिते यांच्यासाठी आग्रही होते. आता त्यांनी होकार दिल्याने माढ्याचं राजकीय युद्ध चांगलच रंगण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयसिंह मोहिते यांचं मन वळविण्यात यश मिळाल्याने राष्ट्रवादीलाही धक्का बसण्याची शक्यता आहे. माढ्यात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 27, 2019 03:25 PM IST

ताज्या बातम्या