Loksabha election 2019 शिवसेनेची 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ही आहेत नावे

Loksabha election 2019 शिवसेनेची 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ही आहेत नावे

  • Share this:

मुंबई 22 मार्च : भाजपपाठोपाठ शिवसेनेनेही लोकसभेसाठीच्या आपल्या उमेदवारांची यादी आज जाहीर केली यात 21  जणांचा समावेश आहे. सुभाष देसाई यांनी ही यादी जाहीर केली. इतर जागा रविवारी जाहीर करू असं सुभाष देसाई यांनी सांगितलं.


भाजप शिवसेनेच्या युतीमध्ये शिवसेना राज्यातल्या लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी 23 जागा लढविणार आहे.


शिवसेनेचे असे आहेत उमेदवार

Loading...


1) दक्षिण मुंबई - अरविंद सावंत

2) दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे

3) उत्तर पश्चिम - गजानन कीर्तिकर

4) ठाणे - राजन विचारे

5) कल्याण - श्रीकांत शिंदे

6) रायगड - अनंत गिते

7) रत्नागिरी सिंधुदुर्ग - विनायक राऊत

8) कोल्हापूर - संजय मंडलिक

9) हातकणंगले - धैर्यशिल माने

10) नाशिक - हेमंत गोडसे

11) शिर्डी - सदाशिव लोखंडे

12) शिरुर - शिवाजीराव आढळराव-पाटील

13) औरंगाबाद - चंद्रकांत खैरे

14) यवतमाळ-वाशिम - भावना गवळी

15) बुलढाणा - प्रतापराव जाधव

16) रामटेक - कृपाल तुमाने

17) अमरावती- आनंदराव अडसूळ

18) परभणी- संजय जाधव

19) मावळ - श्रीरंग बारणे

20) हिंगोली-हेमंत पाटील

21) उस्मानाबाद-ओमराजे निंबाळकर

भाजपने गुरुवारी देशातल्या 182 लोकसभा उमेदवारांची घोषणा केली त्यात महाराष्ट्रातल्या 16 जागांचा समावेश आहे. त्यात दोन नवे चेहेरे असून बाकी 14 जणांना पुन्हा तिकीट देण्यात आलंय.


 महाराष्ट्रातील भाजपचे उमेदवार

नागपूर - नितीन गडकरी, धुळे- सुभाष भांबरे, वर्धा - रामदास तडस, नंदूरबार - हीना कुमार गावित, रावेल - रक्षा खडसे , अकोला - संजय धोत्रे, गडचिरोली - अशोक महादेवराव नेते, चंद्रपूर - हंसराज गंगाराम अहीर, जालना - रावसाहेब दानवे, भिंवडी - कपिल पाटील, मुंबई नॉर्थ - गोपाल शेट्टी, मुंबई नॉर्थ सेंट्रल - पूनम महाजन,अहमदनगर - सुजय विखे पाटील  बीड - डॉ. प्रीतम मुंडे, लातूर - सुधाकरराव भालेराव श्रृंगारे, सांगली - संजयकाका पाटील


दोन नवे चेहेरे


काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले सुजय विखे पाटील यांना भाजपने नगरमधून उमेदवारी दिलीय. नगरचे सध्याचे खासदार दिलीप गांधी हे सलग तीन वेळा निवडून आले होते मात्र नव्या समिकरणांमुळे त्यांना बाजूला सारत भाजपने सुजय विखेंची निवड केलीय.


तर लातूरमध्ये विद्यमान खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्याबद्दल कार्यकर्ते आणि नागरिकांमध्येही नाराजी होती. त्यामुळ त्यांना तिकीट नाकारण्यात आलंय. तिथून जिल्हा परिषदचे सदस्य सुधाकर श्रृंगारे यांना भाजपने तिकीट दिलंय. श्रृगांरे यांनी गेली काही वर्ष या मतदारसंघात जनसंपर्क ठेवला होता. त्यामुळे त्यांच्या पारड्यात आपलं वजन टाकलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2019 03:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...