आमदारांचा विरोध डावलून यवतमाळमधून पुन्हा भावना गवळींनाच तिकीट

शिवसेना आणि भाजपच्याही आमदारांचा विरोध डावलून भावना गवळी यांनी बाजी मारली आहे. आता सर्वांना सोबत घेऊन प्रचार करण्याचं काम त्यांना करावं लागणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2019 04:25 PM IST

आमदारांचा विरोध डावलून यवतमाळमधून पुन्हा भावना गवळींनाच तिकीट

मुंबई 22 मार्च  : यवतमाळ वाशीम मतदारसंघातल्या सेना आणि भाजपच्या आमदारांचा विरोध डावलून यावेळी शिवसेनेने विद्यमान खासदार भावना गवळी यांना उमेदवारी दिली आहे. 'मातोश्री'शी असलेले उत्तम संबंध आणि जनसंपर्क यामुळे भावना गवळींनी सलग चौथ्यांना तिकीट मिळवलं आहे.

ऐकेकाळी काँग्रेसचा गढ असलेल्या यवतमाळमध्ये शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी विजयाची हॅट्रीक केलीय. मात्र येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांना तिकिट मिळू नये यासाठी  शिवसेना आणि भाजपचे खासदार एकवटले होते.

खासदार भावना गवळी यांना तिकीट मिळू नये यासाठी शिवसेनेचे आमदार आणि राज्यमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गळही घातली होती. त्यांना भाजपच्या आमदारांचाही पाठिंंबा मिळला होता. भाजप आमदार आणि राज्यमंत्री मदन येरावार, आमदार राजेंद्र पाटणी आणि संजय राठोड यांनी  मुख्यमंत्र्यांकडे भावना गवळी नको अशी मागणी केली होती.

भावना गवळी शिवसेनेच्या उमेदवार असल्या तरी  मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगून उमेदवार बदलावावा अशी मागणी  या नेत्यांनी केली होती. पण या मागणीचा काहीही परिणाम दिसला नाही. गवळी या चौथ्यांना निवडून आल्यात तर तो एक विक्रमच होणार आहे. या आधी गुलाब नबी आझाद आणि सुधाकरराव नाईक या दिग्गजांनी या मतदार संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं.

यवतमाळ-वाशिम

Loading...

शिवसेनेच्या भावना गवळी या मतदार संघाच्या खासदार आहेत. या मतदारसंघात यवतमाळच्या चार आणि वाशिमच्या दोन विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या यवतमाळ, पुसद, दिग्रस, राळेगाव आणि वाशिम जिल्ह्यातल्या वाशिम आणि कारंजा या विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश आहे. फेररचनेच्या आधी हा फक्त वाशिम मतदारसंघच होता. नंतर त्यात यवतमाळही जोडण्यात आला.

मतदार

एकूण मतदार – 1755292

पुरुष – 52.49 टक्के

महिला – 47.51 टक्के

2014 मध्ये काय झालं

भावना गवळी,शिवसेना - 477905

शिवाजीराव मोघे,काँग्रेस – 384089

बाळ राठोड, बसपा - 48981

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: shivsena
First Published: Mar 22, 2019 04:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...