पालघरचा पेच सुटला शिवसेनेचे सगळे 23 उमेदवार जाहीर; ही आहे संपूर्ण यादी

पालघर लोकसभा मतदारसंघाचा युतीपुढे असलेला पेच अखेर सुटला. सेनेचा उमेदवार निश्चित झाल्यामुळे आता शिवसेनेचे सर्वच्या सर्व 23 उमेदवार जाहीर झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Mar 26, 2019 03:14 PM IST

पालघरचा पेच सुटला शिवसेनेचे सगळे 23 उमेदवार जाहीर; ही आहे संपूर्ण यादी

मुंबई, 26 मार्च : पालघर लोकसभा मतदारसंघाचा युतीपुढे असलेला पेच अखेर सुटल्यात जमा आहे. शिवसेनेकडे असलेल्या 23 जागांपैकी पालघरची एकच जागा कुणाला लढायला मिळणार याकडे लक्ष होतं. गेल्या वर्षी या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. त्यासाठी सेना आणि भाजप एकमेकांविरोधात उभे होते. सेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा पराभव करत भाजपचे राजेंद्र गावित पालघरमधून निवडून आले होते.

आता सेना वनगांनाच पुन्हा संधी देणार की नवा उमेदवार शोधणार याविषयी उत्सुकता होती. शेवटी भाजपकडून उमेदवार आयात करत सेनेने गावित यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे. आता शिवसेनेचे सर्वच्या सर्व 23 उमेदवार निश्चित झाले आहेत.


शिवसेनेचे असे आहेत 23 उमेदवार


Loading...

1) दक्षिण मुंबई - अरविंद सावंत

2) दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे

3) उत्तर पश्चिम - गजानन कीर्तिकर

4) ठाणे - राजन विचारे

5) कल्याण - श्रीकांत शिंदे

6) रायगड - अनंत गिते

7) रत्नागिरी सिंधुदुर्ग - विनायक राऊत

8) कोल्हापूर - संजय मंडलिक

9) हातकणंगले - धैर्यशिल माने

10) नाशिक - हेमंत गोडसे

11) शिर्डी - सदाशिव लोखंडे

12) शिरुर - शिवाजीराव आढळराव-पाटील

13) औरंगाबाद - चंद्रकांत खैरे

14) यवतमाळ-वाशिम - भावना गवळी

15) बुलढाणा - प्रतापराव जाधव

16) रामटेक - कृपाल तुमाने

17) अमरावती- आनंदराव अडसूळ

18) परभणी- संजय जाधव

19) मावळ - श्रीरंग बारणे

20) हिंगोली-हेमंत पाटील

21) उस्मानाबाद -ओमराजे निंबाळकर

22) सातारा - नरेंद्र पाटील

23) पालघर - राजेंद्र गावित


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 26, 2019 03:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...