lok sabha elections 2019 शिरूरमध्ये रंगणार अमोल कोल्हे आणि आढळरावांची लढाई

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर झाली आहे. यात शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आलीय.

News18 Lokmat | Updated On: Mar 15, 2019 03:47 PM IST

lok sabha elections 2019 शिरूरमध्ये रंगणार अमोल कोल्हे आणि आढळरावांची लढाई

मुंबई15 मार्च  : राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर झाली आहे. यात शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आलीय. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिलीय. युतीत हा मतदारसंघ युतीकडे असून तिथे शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात तुंबळ लढाई होणार आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील यांचा या मतदारसंघावर चांगली पकड आहे. त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. त्यामुळे नवीन असलेले अमोल कोल्हे यांना तिथे शिवाजीरावांचं तगडं आव्हान पेलावं लागणार आहे.

मालिकांपासून दूर राहणार

हातावरील शिवबंधन तोडून घड्याळ बांधल्यानंतर राजकीय पटलावर चर्चेत आलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका संपताच मालिका विश्वातून काही काळसाठी निवृत्ती घेणार असल्याची घोषणा नाशिकच्या मालेगावात केली. कोल्हे यांनी अचानकपणे केलेल्या या घोषणेमुळे मराठी सिनेसृष्टीसोबत राजकीय क्षेत्रातील लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड हे नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील कौळाने येथील भूमिपुत्र असल्याने दरवर्षी त्यांचा जन्मोसोहळा साजरा केला जातो. यंदा ही त्यांचा 156 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांना महाराजा सयाजी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

Loading...

जात विचारू नका

'माझी जात कोणती आहे ते विचारू नका. माझी जात आहे 'छत्रपतींचा मावळा' असं अमोल कोल्हे म्हणाले. 'राष्ट्रवादी काँग्रेस अमोल कोल्हेंना मराठा नव्हे तर माळी म्हणून मैदानात उतरवत आहे. कोल्हे माळी समाजाचे आहेत. कुणी काहीही केलं तरी शिरूरमध्ये शिवसेनाच जिंकणार,' असं खासदार आढळराव पाटलांनी म्हटलं आहे. त्यावर मी छत्रपतींचा मावळा असल्याचा टोला अमोल कोल्हा यांनी लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 15, 2019 03:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...