News18 Lokmat

माढ्यात रंगणार रोहन देशमुख विरुद्ध संजय शिंदे असा सामना?

रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपप्रवेशाने माढ्याचं सर्वच गणित बदलले आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2019 06:17 PM IST

माढ्यात रंगणार रोहन देशमुख विरुद्ध संजय शिंदे असा सामना?

मुंबई 22 मार्च : सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे हे राष्ट्रवादीचे माढ्याचे उमेदवार असतील अशी घोषणा शरद पवारांनी केल्याने अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या माढ्यात भाजपचा उमेदवार कोण असेल याकडे आता लक्ष लागलंय. रणजितसिंह मोहिती पाटील यांच्या भाजप प्रवेशाने या मतदारसंघाचं सर्व गणितच बदलून गेलं असून निवडणुकीत जोरदार संघर्ष होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीची खेळी

संजय हे माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांचे भाऊ आहेत. शिंदे हे मोहिते पाटील यांचे विरोधक तर अजित पवार यांचे समर्थक समजले जातात. अंतर्गत राजकारणामुळे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी संजय शिंदेंना पाठिंबा देत जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळवून दिलं होतं. नव्या राजकीय समिकरणामुळे राष्ट्रवादीने त्यांचं मन वळवून पक्षात घेतलं आणि उमेदवारीही दिली. त्यामुळे राजकीय गणित बदलणार आहे. या बदलांमध्ये माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचंही नाव मागे पडलं.

रणजितसिंह मोहिते पाटील इच्छुक नाहीत

राष्ट्रवादीला धक्का देत भाजपवासी झालेले रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे माढ्याचे उमेदवार असतील असं बोललं जात होतं. मात्र लोकसभेची निवडणुक लढण्यास रणजितसिंह उत्सुक नाहीत अशी माहिती आहे. ते राज्यसभा किंवा विधान परिषदेवर जाऊ शकतात असाही अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

Loading...

भाजपचा उमेदवार कोण?

रोहन देशमुख माढ्यातील भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. रोहन हे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव तर संजय काकडे यांचे जावई आहेत. जावयाच्या खासदारकीच्या उमेदवारीवरुन काकडेंचं बंड थंड झाल्याचीही चर्चा आहे. रोहन हे लोकमंगल मल्टीस्टेट को ऑपरेटिव्हचे चेअरमन आहेत. शरद पवार उमेदवार असल्यास सुभाष देशमुख उमेदवार असणार होते. पण संजय शिंदे यांच्या उमेदवारीमुळे आता रोहन देशमुख उमेदवार असण्याची शक्यता आहे.

VIDEO : मुलं मुलींकडे बघणार नाहीतर काय मुलांकडे बघणार? उदयनराजेंचं विद्यार्थिनीच्या प्रश्नावर उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 22, 2019 06:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...