• होम
  • व्हिडिओ
  • सुजयपासून ते शरद पवारांपर्यंत काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील? UNCUT पत्रकार परिषद
  • सुजयपासून ते शरद पवारांपर्यंत काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील? UNCUT पत्रकार परिषद

    News18 Lokmat | Published On: Mar 14, 2019 01:29 PM IST | Updated On: Mar 14, 2019 02:04 PM IST

    मुंबई, 14 मार्च : मुलगा सुजय याच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ''शरद पवारांनी वडिलांबद्दल केलेलं विधान हे अत्यंत चूकीचं होतं. त्यांनी केलेल्या विधानामुळे मी दुखावलो गेलो आहे,'' असं ते म्हणाले. ''सुजयने घेतलेल्या निर्णयानंतर मी पक्षश्रेष्ठींना भेटून माझी भूमीका स्पष्ट केली. आघाडीचा धर्म पाळण्याचा मी अटोकाट प्रयत्न केले, पण नगरमध्ये मी आता सुजय विरुद्ध आघाडीचा प्रचार करणार नाही,'' असंही त्यांनी यावेळी सांगितलं. तर, सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर आता आपण राजीनामा देणार का? या प्रश्नावर बोलताना ''पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील'' असं ते म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी