News18 Lokmat

पुणे लोकसभा : काँग्रेसकडून अरविंद शिंदे यांना उमेदवारी? जोरदार रस्सीखेच

पुण्यातून उमेदवारीसाठी अरविंद शिंदे यांचं नाव चर्चेत आल्याने इतर इच्छुक नेते नाराज झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Mar 21, 2019 09:41 AM IST

पुणे लोकसभा : काँग्रेसकडून अरविंद शिंदे यांना उमेदवारी? जोरदार रस्सीखेच

पुणे, 21 मार्च : पुणे लोकसभा मतदारसंघासाठी सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. काँग्रेसकडून अरविंद शिंदे यांना उमेदवारी देण्यात येऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात येईल, अशीही चर्चा रंगली होती. पण त्यांना पक्षातून विरोध झाल्याने अरविंद शिंदे यांचं नाव पुढे आलं आहे.

पुण्यातून उमेदवारीसाठी अरविंद शिंदे यांचं नाव चर्चेत आल्याने इतर इच्छुक नेते नाराज झाले आहेत. अभय छाजेड, मोहन जोशी, अनंत गाडगीळ हे काँग्रेस नेतेही पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पण अरविंद शिंदे यांच्या उमेदवारीवर पक्षाकडून विचार केला जात असल्याने या इच्छुक नेत्यांच्या पदरी निराशा पडली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याविरोधात इच्छुक नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. त्यामुळे उमेदवारीवरून पुणे काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे.

पुण्यातील स्थानिक इच्छुकांची यादी मोठी असतानाच यात बाहेरील व्यक्तींची नावे पुढे कशी काय येतात? असा सूर पुण्यातील काँग्रेस नेत्यांमधून उमटला आहे. काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत स्थानिक नेत्यांनी प्रवीण गायकवाड आणि संजय काकडे यांच्या उमेदवारीच्या चर्चेवर नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

Loading...


SPECIAL REPORT : बीडची लोकसभा निवडणूक 'फिक्स मॅच'?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2019 09:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...