नगरमध्ये नरेंद्र मोदींची सभा, या आहेत आजच्या महत्त्वाच्या बातम्या

नगरमध्ये नरेंद्र मोदींची सभा, या आहेत आजच्या महत्त्वाच्या बातम्या

  • Share this:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज अहमदनगरला जाहीर सभा होणार आहे. युतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान सभा घेणार आहे. याच सभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सगळ्यांच लक्ष या सभेकडे लागलं आहे.


मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नांदेडमध्ये प्रचाराची पहिली सभा घेणार आहेत. ते नरेंद्र मोदींना मतदान करू नका, असं आवाहन करणार आहेत. राज्यात अशा प्रकारे ते 10 सभा घेणार आहेत.


काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आज तामिळनाडूत जाहीर सभा आहेत. राहुल हे केरळमधून लढत असल्याने काँग्रेस दक्षिणेत जास्त जोर लावत आहेत. तामिळनाडूत डीएमके आणि काँग्रेसची आघाडी आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंबाजोगाईत प्रीतम मुंडे यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा वाद सध्या गाजतोय. त्यामुळे मुख्यमंत्री नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.


गुरुवारी झालेल्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानामध्ये 'ईव्हीएम'मध्ये बिघाड झाल्याच्या आणि मतदान झाल्यानंतर लावण्यात येणारी शाई पुसली जाण्याच्या तक्रारी आल्या होत्या त्या तक्रारीवर आयोगाकडून स्पष्टीकरण येण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 12, 2019 06:33 AM IST

ताज्या बातम्या