• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'पार्थ'विनाच राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; UNCUT पत्रकार परिषद
  • VIDEO: 'पार्थ'विनाच राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; UNCUT पत्रकार परिषद

    News18 Lokmat | Published On: Mar 14, 2019 04:13 PM IST | Updated On: Mar 14, 2019 04:16 PM IST

    मुंबई, 14 मार्च : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसनं आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली पहिली यादी जाहीर केली. महाराष्ट्रात एकूण 22 जागा लढविण्याचा विचार असून, त्यापैकी राष्ट्रवादी किती लढणार आणि काँग्रेस किती? याबाबचा अद्याप निर्णय व्हायचा असल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत एकूण 12 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. ज्यात हातकणंगले मतदारसंघात राष्ट्रवादीनं स्वाभिमानी पक्षासाठी जागा सोडली आहे. या यादीत नगरच्या उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. उर्वरित यादी येत्या दोन दिवसांत जाहीर होईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं. विशेष, म्हणजे पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर करुनही या यादीत त्यांचा समावेश नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी