लोकसभा 2019 : काँग्रेसची तयारी जोरात 8 उमेदवार ठरले, ही आहे यादी!

जिंकून येण्याचा निकष लक्षात घेऊन उमेदवार निश्चित करण्याचा प्रयत्न या बैठकीत करण्यात आला.

News18 Lokmat | Updated On: Jan 29, 2019 08:58 PM IST

लोकसभा 2019 : काँग्रेसची तयारी जोरात 8 उमेदवार ठरले, ही आहे यादी!

सागर कुलकर्णी, मुंबई 29 जानेवारी : काँग्रेसच्या संसदीय मंडळाची मंगळवारी मुंबईत बैठक झाली. यात 26 मतदारसंघातील उमेदवारांवर चर्चा झाली. बैठकीत प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या प्रस्तावावर नेत्यांनी चर्चा केली. जिंकून येण्याचा निकष लक्षात घेऊन उमेदवार निश्चित करण्याचा प्रयत्न या बैठकीत करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पृथ्विराज चव्हाण यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते.


या बैठकीनंतर प्रत्येक मतदारसंघात निश्चित केलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी दिल्लीला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. जिथे एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छुक आहेत अशी नावेही दिल्लीला पाठविण्यात आली असून तिथेच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.


प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याची काँग्रेसची तयारी आहे. आत्तापर्यंत त्यांच्या सहा बैठका झाल्या मात्र काहीही तोडगा निघाला नाही. मतांची विभागणी होऊ नये असा काँग्रेस प्रयत्न करत आहे.

Loading...


काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची यादी


सोलापूर - सुशीलकुमार शिंदे

वर्धा - चारूलत्ता टोंकस

दक्षिण मुंबई - मिलींद देवरा

यवतमाळ - माणिकराव ठाकरे


काही मतदारसंघात एकापेक्षा जास्त नावं आहेत. त्याचा निर्णय दिल्लीत होणार आहे.


नागपूर - विलास मुत्तेमवार किंवा नाना पटोले

चंद्रपूर - विजय देवतळे किंवा आशिष देशमुख

शिर्डी - भाऊसाहेब कांबळे  

नंदुरबार - के सी पाटील


औरंगाबाद, पुणे यासह काही जागावर उमेदवार नाव चर्चा पुन्हा होणार टिळक भवन येथे आज २६ लोकसभा जागांचा आढावा घेतला गेला आणि त्यात काही उमेदवार नाव जवळपास निश्चित करण्यात आले. ती नावं अशी आहेत.

VIDEO : आपल्यापेक्षा 36 वर्ष लहान असलेल्या 'या' अभिनेत्याला रेखाने मारली मिठी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 29, 2019 08:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...