अजित पवारांच्या पत्नीसोबत रक्ताचं नातं, आता बारामतीतून सुप्रिया सुळेंना आव्हान देणार

राहुल कुल यांच्यासोबत विवाह झालेल्या कांचन यांचं माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 23, 2019 01:02 PM IST

अजित पवारांच्या पत्नीसोबत रक्ताचं नातं, आता बारामतीतून सुप्रिया सुळेंना आव्हान देणार

बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने रासपमधून निवडून आलेले आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन राहुल कुल यांना उमेदवारी दिली आहे.

कांचन कुल यांच्या उमेदवारामुळे बारामतीमध्ये दोन महिला उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे.

रासप आमदार राहुल कुल यांचे इंदापूरमधील काँग्रेस नेते हर्षधवर्धन पाटील आणि भोरचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे या नेत्यांशी चांगले संबंध असल्याचं बोललं जातं.

Loading...

त्यामुळे त्यांना या मतदारसंघात फायदा होऊ शकतो. शिवाय राहुल कुल हे स्वत: दौंड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.

या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांच्या पत्नी कांचन कुल यांना तिकीट दिल्याची माहिती आहे.

कांचन कुल यांनी सक्रिय राजकारणात फार सहभाग घेतला नसला तरीही गेल्या काही काळापासून त्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत.

कांचन कुल यांनी सक्रिय राजकारणात फार सहभाग घेतला नसला तरीही गेल्या काही काळापासून त्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत.

राहुल कुल यांच्यासोबत विवाह झालेल्या कांचन यांचं माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील आहे.

राहुल कुल यांच्यासोबत विवाह झालेल्या कांचन यांचं माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या नात्याने कांचन कुल यांच्या चुलत आत्या आहेत.

राहुल कुल हेदेखील आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते.

पण 2014 साली पक्षाने दौंड मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट न दिल्याने त्यांनी महादेव जानकर यांच्या रासपमध्ये प्रवेश केला.

रासपमधून आमदार झालेल्या राहुल कुल यांची गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली.

त्यातूनच आता राहुल कुल यांच्या पत्नी कांचन यांना भाजपने बारामतीतून उमेदवारी दिली आहे.

पुढे वाचा : अजित पवारांच्या आईंचा 81 वा वाढदिवस, बारामतीत जमले पवार कुटुंबीय

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मातोश्री म्हणजेच आशाताई पवार यांचा सोमवारी 81 वाढदिवस संपूर्ण पवार कुटुंबीयांनी एकत्रित येऊन साजरा केला. यानिमित्त बारामतीत पवार कुटुंबीयांच्या तीन पिढ्या एकत्र आल्या होत्या.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार शर्मिला पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार पवार कुटुंबातील नातू असं संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित होते.

अजित पवारांच्या वडिलांच्या निधनानंतर आशाताई पवारांनीच सर्व मुलांना धीराने सांभाळलं आणि उत्तम संस्कार दिलेत.

सर्व सण उत्सव एकत्र येवून साजरे करण्याची पवार कुटुंबीयांची खासीयत आहे. दिवळीलाही सर्व कुटुंबीय बारामतीत एकत्र येतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2019 12:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...