S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'मी जाती-पातीच्या राजकारणाला कधीच घाबरलो नाही आणि घाबरणार नाही'
  • VIDEO: 'मी जाती-पातीच्या राजकारणाला कधीच घाबरलो नाही आणि घाबरणार नाही'

    Published On: Mar 23, 2019 10:11 AM IST | Updated On: Mar 23, 2019 10:16 AM IST

    पुणे, 23 मार्च : पुण्यातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर न्यूज18 लोकमतशी बोलताना गिरीष बापट म्हणाले की, ''कुणाला उमेदवारी दिली गेली नाही म्हणजे त्याला डच्चू दिला असं मी मानत नाही. अनिल शिरोळे हे देखील चांगले नेते आहेत. पण सारासार विचार करून पक्षाने मला जी संधी दिली आहे त्याचं मी सोनं करून दाखवेन. पुणे मतदार संघात भाजपच प्रचंड बहुमतानं निवडून येईल'' असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ''मी असं वातावरण निर्माण करेन की संपूर्ण जिल्हा भाजपमय होऊन जाईल'' असंही ते म्हणाले. जातीपातीच्या राजकारणाबाबत बोलतांना ''आता लोकं जात बघून नव्हे, तर काम बघून मतं देतात. मी जाती-पातीच्या राजकारणाला कधीच घाबरलो नाही आणि घाबरणार नाही'' असंही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close