पार्थ पवारांना मावळमध्ये काँग्रेसची साथ नाही?

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतलेली ही भूमिका पवार कुटुंबियासाठी नवी डोकेदुखी ठरणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 28, 2019 09:55 PM IST

पार्थ पवारांना मावळमध्ये काँग्रेसची साथ नाही?

गोविंद वाकडे, पुणे 28 मार्च : मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचा जोरदार प्रचार सुरू आहे.  मात्र काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पार्थ यांच्यासोबत काम करणार नाही, अशी भूमिका घेतलीय. त्यामुळे आघाडीत बिघाडी निर्माण झाल्याचं चित्र आहे.

मावळ मतदारसंघातला प्रचार आता रंगात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. घरोघरी भेटीगाठी , कधी पायी, तर कधी रिक्षा आणि ट्रेननं प्रवास करत पार्थ पवार प्रचार करताहेत. मात्र पार्थ यांच्या प्रचारात फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचेच पदाधिकारी दिसताहेत. काँग्रेस आणि आघाडीतील मित्र पक्ष यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी  प्रचारात सहभागी झालेलं दिसत नाहीत.

पार्थ यांच्या प्रचारात काँग्रेसचे पदाधिकारी दिसत नाहीत. तर पार्थ पवारांच्या कार्यक्रम पत्रिकेतही काँग्रेस आणि मित्र पक्षांना स्थान देण्यात आले नाही.  फ्लेक्स आणि पोस्टरवर काँग्रेसवाल्यांना जागा दिली जात नाही. मात्र आघाडीत सर्व काही आलबेल असल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय.

पार्थ पवार ह्यांचा प्रचार करतांना पक्षातील जुन्या -नव्या कार्यकर्त्यांची मनधरणी करून पवार कुटुंब आधीच मेटाकुटीला आलंय. त्यात आता काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतलेली ही भूमिका पवार कुटुंबियासाठी नवी डोकेदुखी ठरणार आहे.

पार्थ पवारांची स्टंटबाजी

Loading...

बुधवारी त्यांनी सीएसएमटी ते पनवेल असा लोकलने प्रवास करून लोकांशी संवाद साधला. त्यानंतर रात्री पनवेलमध्येच मोहल्ला परिसरात पार्थ पवार प्रचारासाठी येणार होते. परिसरातील नागरिकांची भेट घेऊन ते मशिदीत जाणार होते.

मोहल्ला परिसरात जायला उशीर होत असल्याने पार्थ पवार यांनी चक्क पळत हा परिसर गाठल्याच सांगण्यात येत आहे. पार्थ पवार धावतानाचा व्हिडीओ पनवेल मध्ये वाऱ्या सारखा पसरल्यानंतर आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहेत. सभेसाठी उशीर झाला म्हणून पार्थ पवार पळत सभा ठिकाणी जात आहेत अशा आशयाचा मेसेज व्हायरल होतोय.

परंतु मोहल्ला परिसरात पार्थ पवार यांची कुठलीही सभा नसल्याचं समोर येत असून हा निवडणूक पूर्व स्टंट असल्याचंही म्हटलं जात आहे. या स्टंटमुळे सोशल मीडिया वर पार्थ यांना पुन्हा एकदा ट्रोल करण्यात येतं असून निवडणुकीपर्यंत असे अनेक स्टंट पहायला मिळतील अशी टीका सोशल मीडियावर होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 28, 2019 09:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...