औरंगाबाद, जालन्यासह काँग्रेसकडून महाराष्ट्रातील आणखी 5 उमेदवार जाहीर

काँग्रेसकडून अनेक नवख्या उमेदवारांना संधी देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 23, 2019 08:24 AM IST

औरंगाबाद, जालन्यासह काँग्रेसकडून महाराष्ट्रातील आणखी 5 उमेदवार जाहीर

सागर कुलकर्णी, मुंबई, 23 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आणखी पाच मतदारासंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये लातूर, चंद्रपूर, जालना, औरंगाबाद आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. काँग्रेसकडून अनेक नवख्या उमेदवारांना संधी देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.

मतदारसंघ आणि काँग्रेस उमेदवार

चंद्रपूर येथे विनायक बांगडे हे काँग्रेसचे उमेदवार असतील. नरेश पुगलिया आणि विजय वड्डेटीवार गटातील मतभेदाच्या वादात अखेर बांगडे यांच नाव समोर आलं आहे.

जालना- विलास औताडे

औरंगाबाद- सुभाष झांबड

Loading...

भिवंडी- सुरेश तावरे

लातूर- मच्छिंद्र कामत

दरम्यान, भाजपनेही महाराष्ट्रातील आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये जळगाव, सोलापूर, बारामती, दिंडोरी, नांदेड, पुणे या सहा मतदारसंघातील उमेदवार भाजपने घोषित केले आहेत. पुण्यातून विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचं तिकीट कापत पालकमंत्री गिरीश बापट यांना संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे, बारामतीतून दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपची दुसरी यादी जाहीर, कुठून कोण लढणार?

जळगाव - स्मिता वाघ

नांदेड - प्रताप पाटील चिखलीकर

बारामती - कांचन राहुल कुल

दिंडोरी - भारती पवार

सोलापूर - जयसिद्धेश्वर स्वामी

बारामतीतून सुप्रिया सुळेंना कुल यांचे आव्हान

बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन राहुल कुल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे बारामतीमध्ये दोन महिला उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. रासप आमदार राहुल कुल यांचे काँग्रेस नेते हर्षधवर्धन पाटील आणि काँग्रेस आमदार संग्राम थोपटे या नेत्यांशी चांगले संबंध असल्याचं बोललं जातं. त्यामुळे त्यांना या मतदारसंघात फायदा होऊ शकतो. शिवाय राहुल कुल हे स्वत: दौंड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्यामुळे भाजपने त्यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपने तिकीट दिल्याची माहिती आहे.

पुण्यातून शिरोळेंचा पत्ता कट

पुण्यातून भाजपने पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी देत विद्यमान खासदार अनिल शिरोळे तिकीट नाकारले आहे. बापट गेली अनेक वर्ष खासदारकी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. अखेर अनिल शिरोळे यांना डच्चू देत पक्षाने बापट यांना संधी दिली आहे.


SPECIAL REPORT : पवारांच्या खेळीने भाजपचा डाव उलटला, कोण लढणार?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2019 07:37 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...