उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निरुत्साह, राहिले फक्त दोन दिवस

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निरुत्साह, राहिले फक्त दोन दिवस

  • Share this:

प्रवीण मुधोळकर, नागपूर : पुर्व विदर्भात 11 एप्रिलला पहिल्या टप्प्यात निवडणूका असतांना उमेदवारी अर्ज भरण्याकडे सर्वच राजकीय पक्षांचा निरुत्साह आहे. सोमवार 25 मार्च हा उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिल्या टप्प्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फारसा उत्साह दिसत नाही. शेवटच्या दिवशीच सर्व अर्ज दाखल होतील अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पहिल्या टप्प्यात लोकसभा निवडणूका असणाऱ्या नागपूर लोकसभा मतदार संघात निवडणुकीसाठी आतापर्यंत केवळ चार अर्जच दाखल झाले आहेत. तर रामटेक लोकसभा मतदार संघातही तीनच उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे. नागपूर आणि रामटेक लोकसभा मिळून गेल्या काही दिवसात १४८ लोकांनी १९० अर्ज घेतले अशी माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिली.

पुर्व विदर्भात आतापर्यंत एकाही मोठ्या पक्षाच्या उमेदवाराने अर्ज सादर केलेला नाही. गडचिरोलीत काँग्रेसकडू नामदेव ऊसेंडी यांनी अर्ज भरलाय. नागपुर लोकसभा मतदार संघातून भाजपतर्फे नितीन गडकरी तर काँग्रेसतर्फे नाना पटोले यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. परंतु त्यांनीही अद्याप अर्ज भरलेला नाही.  विदर्भ निर्माण महामंचचे उमेदवार अ‍ॅड. सुरेश माने यांनी उमेदवारी अर्ज भरून शक्तीप्रदर्शन केले.

पुर्व विदर्भात उमेदवारी अर्ज करण्यासाठी एक दिवस शिल्लक असतांना बसपा आणि बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवाराची घोषणाही अद्याप व्हायची आहे. बसपा आणि वंचित आघाडीने बंडखोरी टाळण्यासाठीच शेवटच्या दिवशी उमेदवार जाहीर करण्याची रणणीती आखली आहे.

11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार-

वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूड, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम

18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 10 जागांवर होणार मतदान-

बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर

23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांवर होणार मतदान

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांवर होणार मतदान

नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर - पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई - दक्षिण - मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर,शिर्डी

लोकसभा निवडणूक 2014

महाराष्ट्रात 2014 च्या निवडणुकीत भाजप - शिवसेना युती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी अशी सरळ स्पर्धा होती. राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांपैकी 41 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात भाजप- सेना युतीने जिंकल्या आणि काँग्रेस आघाडीचा सपशेल पराभव झाला. काँग्रेसला फक्त 2 जागा जिंकता आल्या तर राष्ट्रवादीने केवळ 4 जागा राखल्या.

महाराष्ट्र 2014 चं पक्षीय बलाबल

एकूण जागा 48

भाजप 23

सेना 18

राष्ट्रवादी काँग्रेस 4

काँग्रेस 2

स्वाभिमानी शेतकरी पक्ष 1


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2019 07:36 PM IST

ताज्या बातम्या