S M L

भाजपकडून महाराष्ट्रातील 16 जणांची पहिली यादी जाहीर, कोण कुठून लढणार?

लोकसभा निवडणुकीसाठी अखेर भाजपने आज 182 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातून एकूण 16 जणांना उमेदवारी जाहीर झाली आहे

News18 Lokmat | Updated On: Mar 21, 2019 09:46 PM IST

भाजपकडून महाराष्ट्रातील 16 जणांची पहिली यादी जाहीर, कोण कुठून लढणार?

21 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी अखेर भाजपने आज 182 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातून एकूण 16 जणांना उमेदवारी जाहीर झाली आहे. नागपूरमधून नितीन गडकरी, बीडमधून प्रीतम मुंडे, धुळ्यातून सुभाष भामरे, रावेरमधून रक्षा खडसे या विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली आहे. अहमदनगरमधून सुजय विखे पाटील आणि लातूरमधून सुधाकरराव भालेराव-शृंगारे यांना तिकीट देण्यात आले आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे समजले जाणारे रामदास तडस यांना वर्ध्यातून उमेदवारी देण्यात आली आहे.


महाराष्ट्राची 16 जणांची यादी


नागपूर - नितीन गडकरी

धुळे- डॉ सुभाष भामरे

वर्धा - रामदास तडस

Loading...

नंदूरबार - हिना गावित

रावेर - रक्षा खडसे

अकोला - संजय धोत्रे

गडचिरोली - अशोक महादेवराव नेते

चंद्रपूर - हंसराज गंगाराम अहिर

जालना - रावसाहेब दानवे

भिवंडी - कपील पाटील

मुंबई उत्तर - गोपाल शेट्टी

मुंबई उत्तर मध्य - पूनम महाजन

अहमदनगर - सुजय विखे पाटील

बीड - डाॅ. प्रीतम मुंडे

लातूर - सुधाकरराव भालेराव - शृगांरे

सांगली - संजयकाका पाटील


सत्ताधारी भाजपने लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत देशातील महत्त्वाच्या मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमधून निवडणूक लढवणार आहेत. तर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

महत्त्वाचे उमेदवार

वाराणसी- नरेंद्र मोदी

गांधीनगर- अमित शहा

लखनऊ- राजनाथ सिंह

नागपूर- नितीन गडकरी

अमेठी- स्मृती इराणी


लोकसभा निवडणुक 2019

लोकसभा निवडणुकांच्या (LokSabha Elections 2019) तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात सात टप्प्यांमध्ये 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान निवडणुका होतील. नवी दिल्लीमध्ये रविवारी निवडणूक आयोगाने (Election Commission) या तारखांची घोषणा केली. देशात सात टप्प्यांत तर महाराष्ट्रात चार टप्प्यांत लोकसभा निवडणुका होतील.


11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार-

वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूड, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम

18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 10 जागांवर होणार मतदान-

बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर

23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांवर होणार मतदान

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले


29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांवर होणार मतदान

नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर - पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई - दक्षिण - मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर, शिर्डी



लोकसभा निवडणूक 2014



महाराष्ट्रात 2014 च्या निवडणुकीत भाजप - शिवसेना युती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी अशी सरळ स्पर्धा होती. राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांपैकी 41 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात भाजप- सेना युतीने जिंकल्या आणि काँग्रेस आघाडीचा सपशेल पराभव झाला. काँग्रेसला फक्त 2 जागा जिंकता आल्या तर राष्ट्रवादीने केवळ 4 जागा राखल्या.



महाराष्ट्र 2014 चं पक्षीय बलाबल

एकूण जागा 48

भाजप 23

सेना 18

राष्ट्रवादी काँग्रेस 4

काँग्रेस 2

स्वाभिमानी शेतकरी पक्ष 1

==================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2019 07:53 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close