राज्यात भाजपचं जोरदार धक्कातंत्र, 4 खासदारांचं तिकीट कापलं

यावेळी भाजपने आपल्या अनेक खासदारांना डच्चू दिला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 23, 2019 09:43 AM IST

राज्यात भाजपचं जोरदार धक्कातंत्र, 4 खासदारांचं तिकीट कापलं

सागर कुलकर्णी, मुंबई, 23 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर झाली आहे. यामध्ये जळगाव, सोलापूर, बारामती, दिंडोरी, नांदेड, पुणे या सहा मतदारसंघातील उमेदवार भाजपने घोषित केले आहेत. पुण्यातून विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचं तिकीट कापत पालकमंत्री गिरीश बापट यांना संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे, बारामतीतून दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

यावेळी भाजपने आपल्या अनेक खासदारांना डच्चू दिला आहे. जळगाव येथे विद्यमान खासदार ए टी पाटील यांचं तिकीट कापून आमदार स्मिता वाघ यांना तिकीट देण्यात आलं आहे. तर सोलापुरातून खासदार शरद बनसोडे यांच्या जागी जयसिद्धेश्वर स्वामी आणि दिंडोरीमधून यावेळी हरिषचंद्र चव्हाण यांच्या जागी राष्ट्रवादीतून आलेल्या भारती पवार यांना संधी देण्यात आली आहे.

भाजपची दुसरी यादी जाहीर, कुठून कोण लढणार?

पुणे - गिरीश बापट

जळगाव - स्मिता वाघ

Loading...

नांदेड - प्रताप पाटील चिखलीकर

बारामती - कांचन राहुल कुल

दिंडोरी - भारती पवार

सोलापूर - जयसिद्धेश्वर स्वामी

बारामतीतून सुप्रिया सुळेंना कुल यांचे आव्हान

बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन राहुल कुल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे बारामतीमध्ये दोन महिला उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. रासप आमदार राहुल कुल यांचे काँग्रेस नेते हर्षधवर्धन पाटील आणि काँग्रेस आमदार संग्राम थोपटे या नेत्यांशी चांगले संबंध असल्याचं बोललं जातं. त्यामुळे त्यांना या मतदारसंघात फायदा होऊ शकतो. शिवाय राहुल कुल हे स्वत: दौंड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्यामुळे भाजपने त्यांच्या पत्नी कांचन कुल यांना तिकीट दिल्याची माहिती आहे.

पुण्यातून शिरोळेंचा पत्ता कट

पुण्यातून भाजपने पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी देत विद्यमान खासदार अनिल शिरोळे तिकीट नाकारले आहे. बापट गेली अनेक वर्ष खासदारकी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. अखेर अनिल शिरोळे यांना डच्चू देत पक्षाने बापट यांना संधी दिली आहे.


VIDEO : मुलं मुलींकडे बघणार नाहीतर काय मुलांकडे बघणार? उदयनराजेंचं विद्यार्थिनीच्या प्रश्नावर उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2019 09:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...