भाजपचा भंडारा-गोंदियाचा उमेदवार ठरला, सुनील मेंढे यांच्या नावाची होणार घोषणा

भंडारा-गोंदिया मतदारसंघासाठी भाजपच्या उमेदवारावर अखेर शिक्कामोर्तब झालं असल्याची माहिती आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 24, 2019 01:04 PM IST

भाजपचा भंडारा-गोंदियाचा उमेदवार ठरला, सुनील मेंढे यांच्या नावाची होणार घोषणा

भंडारा, 24 मार्च : भंडारा-गोंदिया मतदारसंघासाठी भाजपच्या उमेदवारावर अखेर शिक्कामोर्तब झालं असल्याची माहिती आहे. भंडाऱ्याचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना भाजप उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

निवडणूक ऐन तोंडावर आलेली असताना भंडारा - गोंदीयाचे उमेदवार भाजप आणि राष्ट्रवादीनेही जाहीर केलेले नाहीत. अशातच कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झालं. आता अखेर भाजपकडून सुनील मेंढे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. याबाबत आज कोल्हापूर इथं होणाऱ्या युतीच्या मेळाव्यात घोषणा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नाही.

सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर उद्या भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती मिळाली आहे. तसंच माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीही भाजपकडून रणजितिसंह नाईक निंबाळकरांना देण्यात येण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुका जाहीर होताच काहींनी भाजप तर काहींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षबदलामध्ये आता आणखी एका नावाची भर पडली आहे.


VIDEO: बारामतीतून उमेदवारी मिळाल्यानंतर कांचन कुल यांची पहिली प्रतिक्रिया


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 24, 2019 12:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close