मुंबई 28 मार्च : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभेची निवडणूक न लढविण्याची घोषणा केली मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींविरूद्ध मतदान करा असं आवाहन केलं होतं. राज यांच्या मोदी विरोधामुळे भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आशीष शेलार यांनी राज ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केलीय.
राज ठाकरे यांना सगळे नगरसेवक सोडून गेले, आमदार सोडून गेले त्यामुळे राज ठाकरे एकटे पडले आहेत. त्यामुळे ते बारामतीचे काका शरद पवारांच्या काकांकडे गेले आणि त्यांनी राज यांना फक्त लढ म्हटले. "शिवाजीपार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे" अशी टीका त्यांनी राज ठाकरेंवर केलीय.
शेलारांनी काय म्हटलंय ट्विटमध्ये
सोडून गेले नगरसेवक...सोडून गेले आमदार...एकटे एकटे वाटले म्हणून स्वतःच्या काकांच्या नाही..जाणत्या राजाला गाठले..पाठीवर हात ठेऊन..नव्या भाषणाची स्क्रिप्ट हातात देऊन.. बारामतीच्या काकांनी "फक्त लढ" असे म्हटले.!!
"शिवाजीपार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे"
सोडून गेले नगरसेवक...सोडून गेले आमदार...एकटे एकटे वाटले म्हणून स्वतःच्या काकांच्या नाही..जाणत्या राजाला गाठले..पाठीवर हात ठेऊन..नव्या भाषणाची स्क्रिप्ट हातात देऊन.. बारामतीच्या काकांनी "फक्त लढ" असे म्हटले.!!
— Chowkidar ashish shelar (@ShelarAshish) March 28, 2019
"शिवाजीपार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे"#ChokidarकेSideEffects
काय म्हणले होते राज ठाकरे
लोकसभेच्या 2019 च्या निवडणुका लढवणार नाही अशी घोषणा केल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 19 मार्चला आपल्या भूमिकेचा खुलासा करत मोदींवर सडकून टीका केली होती. ते म्हणाले, मला कधीच लोकसभेची निवडणूक लढवायची नव्हती. देश सध्या एका संकटातून जात आहे.
नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे देशावरचं संकट असून ते दूर झालं पाहिजे यासाठीच प्रचार करणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. ही निवडणूक कुठल्या पक्षांची नाही तर मोदी,शहांविरूद्ध आहे असंही ते म्हणाले. मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोदी आणि शहांच्या विरूद्ध काम करावे असं आवाहनही त्यांनी केलं.
बारामतीचा पोपट
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांनाही त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं होतं. राज हे बारामतीचे पोपट आहेत अशी टीका त्यांनी केली होती. बारामतीने स्क्रिप्ट लिहून दिल्यानेच ते मोदींवर टीका करत आहेत असंही मुख्यमंत्री म्हणाले होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा