S M L

'युती'च्या संयुक्त पत्रकार परिषदेतले 10 मुख्य मुद्दे

Updated On: Feb 18, 2019 08:40 PM IST

'युती'च्या संयुक्त पत्रकार परिषदेतले 10 मुख्य मुद्दे

मुंबई 18 फेब्रुवारी : नाही नाही म्हणता म्हणता अखेर भाजप आणि शिवसेना मिळून लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकी एकत्र लढणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची अधिकृत घोषणा केली. हिंदुत्व, देशावरचं दहशतवादाचं संकट अशा अनेक कारणांचा हवाला देत भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र लढणार असल्याचं दोनही नेत्यांनी सांगितलं. गेली चार वर्ष शिवसेना भाजपवर सातत्याने तुटून पडत होती. तर यापुढे युती नाही शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढणार अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र देशातली बदलती राजकीय स्थिती लक्षात घेऊन भाजप आणि शिवसेनेनं सामंज्यस्याची भूमिका घेतली आणि युतीवर अखेर शिक्कामोर्तब झालं. या संयुक्त पत्रकार परिषदेत भाजप आणि शिवसेनेचे महत्त्वाचे सर्व नेते उपस्थित होते.


हे आहेत महत्त्वाचे मुद्दे


मुख्यमंत्री काय म्हणाले?

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवणार.  फक्त निवडणुकीसाठीच नाही तर अनेक व्यापक मुद्यावर आम्ही एकत्र लढणार. राम मंदिर लवकरात लवकर व्हावं ही भाजपचीही भूमिका आहे.

भाजप आणि शिवसेनेची 25 वर्षांची मैत्री. काही मतभेद झाले असले तरी हिंदुत्वाच्या विचारांशी आम्ही बांधील आहोत. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी काही मतभेत झाले होते. मात्र गेली साडेचारवर्ष आम्ही केंद्रात आणि राज्यात एकत्र आहोत.

Loading...

शेतकरी कर्जमाफी योजनेचा फायदा ज्या शतकऱ्यांना मिळाला नाही. त्यांनाही नव्याने फायदा कसा मिळेल याची काळजी घेणार.

नाणार प्रकल्प आता कोकणात होणार नाही. ज्या ठिकाणी लोकांचा विरोध नसेल त्या ठिकाणी होईल.

काही पक्ष एकत्र येवून राष्ट्रीय स्तरावर महाघाडी तयार करत राष्ट्रीय विचारांना आव्हान देण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे आम्ही एकत्र.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

विधानसभा निवडणुकीनंतर जबाबदारीचं वाटपही सम-समान होईल हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

झालं गेलं विसरून जाऊ, पण कटू अनुभव येऊ नये अशी इच्छा आहे.

शहीदांचं बलिदान वाया जाणार नाही. केंद्र सरकार पाकिस्तानला धडा शिकवेल अशी आशा आहे.

देशाच्या व्यापक हितासाठी आम्ही युती केली. कर्जमाफीत काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या दूर केल्या जातील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

देशात तातडीने राम मंदिर झालंच पाहिजे. नाणार प्रकल्प ज्या ठिकाणी लोकांना मान्य असेल त्या ठिकाणी व्हावा.

अमित शहा काय म्हणाले?

महाराष्ट्रातल्या 48 पैकी 45 जागा आम्ही जिंकणार आहोत.

भाजप आणि शिवसेनेच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण झाली. केंद्रात आणि राज्यात भाजप आणि शिवसेनेचं सरका यावं ही लोकांची इच्छा आहे.

शिवसेना आणि अकाली दल हे भाजपचे सर्वात जुने सहकारी. आमच्यातले मतभेत आजच, याच टेबलवर दूर झाले. आम्ही आता नव्याने कामाला लागणार आहोत.

राम मंदिर, सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि महत्त्वाच्या मुद्यावर आम्ही एकत्र आहोत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 18, 2019 08:38 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close