S M L

लोकनाट्य तमाशाच्या महिला कलावंतांचे कपडे फाडून बेदम मारहाण

लोकनाट्य तमाशाच्या तंबूत घुसून 20 ते 25 जणांच्या टोळक्याने महिला कलावतांवर हल्ला केल्याचा घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर टोळक्याने महिलांचे कपडे फाडून त्यांना बेदम मारहाण केली.

Updated On: Apr 26, 2019 07:44 PM IST

लोकनाट्य तमाशाच्या महिला कलावंतांचे कपडे फाडून बेदम मारहाण

अहमदनगर, 26 एप्रिल- लोकनाट्य तमाशाच्या तंबूत घुसून 20 ते 25 जणांच्या टोळक्याने महिला कलावतांवर हल्ला केल्याचा घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर टोळक्याने महिलांचे कपडे फाडून त्यांना बेदम मारहाण केली. श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथे यात्रेत हा धक्कादायक प्रकार घडला.

मिळालेली माहिती अशी की, लोणार येथे यात्रेनिमित्त शिवकन्या बडे यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान 20 ते 25 जणांच्या टोळके तंबूत घुसले. टोळक्याने 8 ते 10 महिलांचे अंगावरील कपडे फाडली आणि त्यांना बेदम मारहाण केली. तसेच तंबूचेही नुकसान केले. तमाशाच्या फडावर झालेल्या गोंधळामुळे गावात तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.VIDEO: भिवंडीत उमेदवाराच्या कार चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 26, 2019 07:44 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close