S M L

लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत- रावसाहेब दानवे

आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष समविचारी पक्षांसोबत युती करणार असल्याचंही दानवे यावेळी म्हणाले

Updated On: Jul 14, 2018 07:40 PM IST

लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत- रावसाहेब दानवे

अमरावती, 14 जुलै : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या सोबत होणार नसून वेगवेगळ्या होणार असल्याचे संकेत भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेव दानवे यांनी दिले तर आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष समविचारी पक्षांसोबत युती करणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले. अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा विभागीय कार्यकर्ता मेळावा आज आयोजित केला आहे.

कुणी बिडीमुळे तर कुणी दिवा पडल्यामुळे,शासन दरबारी मृत शेतकऱ्यांची क्रुर थट्टा

या मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे आज अमरावतीत उपस्थित राहणार आहेत.

आगामी निवडणुकांसंदर्भात उद्धव यांनी पत्ते ठेवलेत राखुन!

पुढे बोलताना दानवे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला हरवण्याकरिता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत जी महाआघाडी तयार होणार आहे त्या महाआघाडीमध्ये लवकरच बिघाडी होणार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

Loading...

नोटबंदीसारखं राम मंदिर का होऊ शकत नाही? -उद्धव ठाकरे

पक्ष संघटन मजबूत कारण्यासोबतच भविष्यातील पक्षपातळीवरच्या विविध कार्यक्रमांचे नियोजन भाजप संपूर्ण राज्यभरात करणार असल्याचं ते यावेळी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 14, 2018 07:40 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close