PM पदासाठी पवारांची राहुल गांधींना चौथ्या क्रमांकाची पसंती, पहिले 3 कोण?

PM पदासाठी पवारांची राहुल गांधींना चौथ्या क्रमांकाची पसंती, पहिले 3 कोण?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानपदाबाबत भाष्य केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 28 एप्रिल : देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक निकालानंतर पंतप्रधानपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याबाबत प्रत्येकजण अंदाज व्यक्त करताना दिसत आहे. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानपदाबाबत भाष्य केलं आहे.

शरद पवार यांनी एका राष्ट्रीय वाहिनीला नुकतीच मुलाखत दिली. त्यामध्ये पवारांना पंतप्रधानपदाबाबत विचारला असता ते म्हणाले की, 'ममता बॅनर्जी, एन. चंद्राबाबू नायडू, मायावती आणि राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे चांगले दावेदार ठरू शकतात.' यामध्ये पवारांनी राहुल गांधींपेक्षा इतर तीन नावे पंतप्रधानपदासाठी अधिक प्रभावी ठरु शकतात, असं म्हटलं आहे.

याच मुलाखतीत शरद पवार यांनी निवडणुकीनंतर तयार होणाऱ्या परिस्थितीवरही भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, निवडणूक निकालानंतर आम्ही एका समान अजेंड्यावर एकत्र येऊन देशाला नवा पर्याय देण्याचा प्रयत्न करू. एनडीएतीलही काही पक्ष आघाडीत येतील, याबाबतचे संकेत शरद पवारांनी दिले आहेत.

पवारांच्या नावाचीही चर्चा

दरम्यान, शरद पवार यांचंही नाव कायमंच पंतप्रधानपदाच्या शर्यतीत राहिलं आहे. यावेळी जर कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यास पवारांचं नाव पुढे येऊ शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Loading...

राज ठाकरे, नारायण राणे, राजू शेट्टी, यांच्यापासून ते अगदी ममता बॅनर्जी एम. के. स्टॅलिन, चंद्राबाबू नायडू, फारुख अब्दुल्ला, नितीश कुमार, शरद यादव आणि अगदी तेजस्वी यादवपर्यंत अनेक राज्यांच्या अनेक पक्षांच्या संपर्कात शरद पवार असतात.

गेल्या काही काळात शरद पवार या यादीतल्या सगळ्यांना आणि आणखीही काही नेत्यांना भेटले. तिसऱ्या आघाडीची शक्यता चाचपडून बघताना अशी आघाडी झालीच तर त्यात महत्त्वाची भूमिका महाराष्ट्राचा हाच मुरलेला राजकारणी निभावणार असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

पवारांसाठी ही शेवटची संधी?

शरद पवार यांचं लक्ष दिल्लीच्या तख्ताकडे आहे आणि 2019च्या लोकसभा निवडणुका ही त्यांच्यासाठी अखेरची संधी असल्याचं मानलं जातंय. राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवार यांच्या खास मर्जीतले कार्यकर्ते प्रफुल्ल पटेल यांनी यापूर्वीच पुढच्या लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार पंतप्रधान होतील, असं म्हटलं होतं. पवार स्वतः मात्र याबाबत उघडपणे काही बोललेले नाहीत. उलट त्यांनी पुढची लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असंही त्यांनी जाहीर केलंय.


VIDEO : भाजपला निवडून द्या, असं म्हणत गडकरी बाजूला झाले आणि आली भोवळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 28, 2019 09:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...