News18 Lokmat

लोकसभा निवडणूक 2019 : नितीन गडकरींच्या विरोधात काँग्रेसकडून 'हा' उमेदवार रिंगणात!

लोकसभा निवडणुकीसाठी नाना पटोले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपचे मंत्री नितीन गडकरी यांचा अभेद्द असा गड समजल्या जाणाऱ्या नागपूरमधून पटोले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 13, 2019 09:50 PM IST

लोकसभा निवडणूक 2019 : नितीन गडकरींच्या विरोधात काँग्रेसकडून 'हा' उमेदवार रिंगणात!

13 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातून 5 नावं जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये नागपूरमधून नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर हा भाजपचे नेते आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले अशी मोठी लढत पाहण्यास मिळणार आहे. तसंच मुंबई दक्षिणमधून मिलिंद देवरा, उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त, सोलापूरमधून सुशील कुमार शिंदे आणि गडचिरोलीतून डॉ.नामदेव उसेंडी यांनाही उमेदवारी करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, नाना पटोले यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. नाना पटोले हे भंडारा मतदारसंघातून निवडून आले होते. परंतु, नाना पटोले हे जास्त दिवस भाजपमध्ये रमले नाही. अखेर त्यांनी भाजपला 'जय श्रीराम' करत काँग्रेसमध्ये घरवापसी केली होती.

काँग्रेसमध्ये प्रवेश केलानंतर भंडाऱ्यात झालेल्या पोटनिवडणुकीत नाना पटोले रिंगणात उतरले नव्हते. भंडाऱ्यातील जागाही राष्ट्रवादीसाठी सोडण्यात आली होती. त्यामुळे ही जागा भाजपने प्रतिष्ठेची केली होती. परंतु, मतदारांनी भाजपला नाकारत राष्ट्रवादीच्या पारड्यात मत पाडली होती.

अखेर लोकसभा निवडणुकीसाठी नाना पटोले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपचे मंत्री नितीन गडकरी यांचा अभेद्द असा गड समजल्या जाणाऱ्या नागपूरमधून पटोले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. परंतु, नागपूरमध्ये पटोले यांना उमेदवारी देण्यावरुन काँग्रेसमधूनच विरोध होता. काँग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार, विकास ठाकरे यांनी पटोले यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. आता पटोले यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातून 5 उमेदवार

Loading...

१. नागपूर - नाना पटोले

२. गडचिरोली - डॉ नामदेव उसेंडी

३. उत्तर मध्य मुंबई - प्रिया दत्त

४. मुंबई दक्षिण - मिलिंद देवरा

५. सोलापूर  - सुशीलकुमार शिंदे

असा आहे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम

लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Elections 2019) तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात सात टप्प्यांमध्ये 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान निवडणुका होतील. नवी दिल्लीमध्ये रविवारी निवडणूक आयोगाने (Election Commission) या तारखांची घोषणा केली. देशात सात टप्प्यांत तर महाराष्ट्रात चार टप्प्यांत लोकसभा निवडणुका होतील.

11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार-

वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूड, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम

18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 10 जागांवर होणार मतदान-

बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर

23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांवर होणार मतदान

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांवर होणार मतदान

नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर - पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई - दक्षिण - मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर, शिर्डी

लोकसभा निवडणूक 2014

महाराष्ट्रात 2014 च्या निवडणुकीत भाजप - शिवसेना युती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी अशी सरळ स्पर्धा होती. राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांपैकी 41 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात भाजप- सेना युतीने जिंकल्या आणि काँग्रेस आघाडीचा सपशेल पराभव झाला. काँग्रेसला फक्त 2 जागा जिंकता आल्या तर राष्ट्रवादीने केवळ 4 जागा राखल्या.


महाराष्ट्र 2014 चं पक्षीय बलाबल

एकूण जागा 48

भाजप 23

सेना 18

राष्ट्रवादी काँग्रेस 4

काँग्रेस 2

स्वाभिमानी शेतकरी पक्ष 1

=================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 13, 2019 09:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...