शरद पवारांचा नंबर लागणार? 'या' तारखेला ठरणार विरोधी पक्षांचा PM पदाचा उमेदवार

भाजपविरोधी आघाडीच्या या बैठकीत पंतप्रधानपदाच्या नावाबाबत चर्चा होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: May 2, 2019 01:24 PM IST

शरद पवारांचा नंबर लागणार? 'या' तारखेला ठरणार विरोधी पक्षांचा PM पदाचा उमेदवार

नवी मुंबई, 2 मे : लोकसभा निवडणुकीसाठीचं महाराष्ट्रातील मतदान संपलं असलं तरीही अजूनही देशपातळीवर या निवडणुकीची धामधूम सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. तुमच्याकडे पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? या प्रश्नावरून भाजपकडून विरोधकांना टार्गेट करण्यात येतं. त्यामुळे आता पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची 21 मे रोजी दिल्लीत बैठक होणार आहे.

भाजपविरोधी आघाडीच्या या बैठकीत पंतप्रधानपदाच्या नावाबाबत चर्चा होणार आहे. याबाबत चंद्राबाबू नायडू यांनी माहिती दिली आहे. या बैठकीला तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी, बसपा अध्यक्षा मायावती, अखिलेश यादव, शरद पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

पंतप्रधानपदाबाबत काय म्हणाले होते शरद पवार?

शरद पवार यांनी एका राष्ट्रीय वाहिनीला नुकतीच मुलाखत दिली. त्यामध्ये पवारांना पंतप्रधानपदाबाबत विचारला असता ते म्हणाले की, 'ममता बॅनर्जी, एन. चंद्राबाबू नायडू, मायावती आणि राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे चांगले दावेदार ठरू शकतात.' यामध्ये पवारांनी राहुल गांधींपेक्षा इतर तीन नावे पंतप्रधानपदासाठी अधिक प्रभावी ठरु शकतात, असं म्हटल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यामुळे देशभरात मोठी चर्चाही झाली. पण नंतर त्या वक्तव्याबाबत शरद पवार यांनी खुलासा केला आहे.

'राहुल गांधी यांच्याशिवाय तुमच्याकडे पंतप्रधानपदाचा कुणीही उमेदवार नाही का? असा प्रश्न मला विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना इतर तीन नावं सांगत मी म्हणालो की, आमच्याकडे अनेक पर्याय आहेत. पण माध्यमांनी अप्रगल्भता दाखवत माझं वक्तव्य वेगळ्या अर्थाने दाखवलं,' असा खुलासा शरद पवार यांनी केला होता.

Loading...

याच मुलाखतीत शरद पवार यांनी निवडणुकीनंतर तयार होणाऱ्या परिस्थितीवरही भाष्य केलं होतं. ते म्हणाले की, निवडणूक निकालानंतर आम्ही एका समान अजेंड्यावर एकत्र येऊन देशाला नवा पर्याय देण्याचा प्रयत्न करू. एनडीएतीलही काही पक्ष आघाडीत येतील, याबाबतचे संकेत शरद पवारांनी दिले आहेत.


SPECIAL REPORT : मोदींविरोधात लढण्याआधीच माजी सैनिक हरला!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2019 11:35 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...