बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी मुख्यमंत्र्यांची फिल्डिंग, मात्र भाजपचा हा नेता घेईल सभा

बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी मुख्यमंत्र्यांची फिल्डिंग, मात्र भाजपचा हा नेता घेईल सभा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे होमटाऊन अर्थात बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फिल्डिंग लावली आहे. परंतु बारामतीत पंतप्रधान मोदी यांच्या ऐवजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे सभा घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

  • Share this:

पुणे, 15 एप्रिल- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे होमटाऊन अर्थात बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फिल्डिंग लावली आहे. परंतु बारामतीत पंतप्रधान मोदी यांच्या ऐवजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे सभा घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. पंतप्रधान मोदी हे १६ एप्रिलला पुण्यात मुक्कामी येत आहेत. नंतर १७ एप्रिलला ते अकलुज येथे जाहीर सभा घेतील. मोदी यांनी या दौ-यात बारामतीत सभा घ्यावी, यासाठी मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न सुरु आहे.  मात्र, त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

अमित शहांची शारदा प्रागंणात सभा

अमित शहा यांची बारामतीतील शारदा प्रागंणात येत्या १९ एप्रिल रोजी सभा होणार आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची २१ एप्रिल रोजी होणार आहे. दुसरीकडे, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळतोय. मोदींनंतर भाजपचे तेच 'स्टार प्रचारक' आहे. त्यामुळे भाजपने त्यांची एक सभा खडकवासला विधानसभा मतदारसंघात आयोजित केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभा निवडणुकीच्या वेळी बारामतीत प्रचार सभा घेतली होती.

महाराष्ट्रात काँग्रेस शरद पवार चालवतात- देवेंद्र फडणवीस

लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यूज18 लोकमतशी संवाद साधला. युती, जागा वाटपासह अनेक प्रश्नांना त्यांनी बेधडक उत्तरं दिली.  महाराष्ट्रात शरद पवारच काँग्रेस चालवतात. परंतु काँग्रेसमध्ये अनेक जण अस्वस्थ आहेत. आम्ही घरं फोडणाऱ्यापैकी नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी टीका केली.

व्यापक विचार करून युतीचा निर्णय झाला. तसंच इशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांचं तिकीट कापण्याकरता शिवसेनेचा कोणताही दबाव नव्हता, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, लोक भाजपकडे आकर्षिक होत आहेत.

शिवसेना-भाजप दोन्ही पक्षांनी एकत्र यावे ही जनतेची इच्छा होती. यंदा 2014 पेक्षा मोठी लाट आहे.  पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात मोठं यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बारामतीत महायुतीने कोणतेही फिक्सिंग केले नाही- महादेव जानकर

बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीने कोणतेही फिक्सिंग केले नसून, ही निवडणूक जिंकण्यासाठीच आपण रिंगणात आहोत, असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर यांनी केला आहे. दरम्यान, फिक्सिंग संदर्भात आपण केवळ लोकभावना व्यक्त केल्या, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी दिले.


VIDEO: निवडणुकांआधीच काँग्रेसचा जल्लोष, संजय निरुपमांवर पुष्पवर्षाव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 15, 2019 02:59 PM IST

ताज्या बातम्या