लोकसभेसाठी भाजपकडून आणखी एक उमेदवार यादी जाहीर, ईशान्य मुंबईचं काय?

लोकसभेसाठी भाजपकडून आणखी एक उमेदवार यादी जाहीर, ईशान्य मुंबईचं काय?

भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी आणखी एक यादी जाहीर केली आहे.

  • Share this:

मुंबई, 2 एप्रिल : ईशान्य मुंबई मतदारसंघातील विद्यमान खासदास किरीट सोमय्या यांच्या नावाला शिवसेनेकडून सातत्याने विरोध होत आहे. त्यामुळे या जागेवर भाजप कुणाला उमेदवारी देणार, याची उत्सुकता लागलेली आहे. अशातच भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी आणखी एक यादी जाहीर केली आहे. मात्र या यादीतही ईशान्य मुंबईच्या जागेवरील उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही.

दरम्यान, या मतदारसंघातून भाजपच्या मनोज कोटक यांचं नाव पुढे येत आहे. शिवसेना भाजपच्या समन्वय समितीनं दिलेल्या अहवालानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या संसदीय समितीनं हा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.

ईशान्य मुंबई मतदारसंघातले विद्यमान खासदास किरीट सोमय्या यांच्या नावाला शिवसेनेकडून सातत्याने विरोध होत होता. त्यामुळे भाजप उमेदवार बदलला, अशी चर्चा आहे. किरीट सोमय्यांची भेट शिवसेनेनं नाकारल्यानंतर सोमय्यांचा पत्ता कट होणार याची चर्चा सुरू झाली. त्यातच प्रवीण छोडा आणि पराग शहा यांनी ईशान्य मुंबईतून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु केल्याची चर्चा सुरू झाली.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसैनिकांनी 'एकच स्पीरीट नो किरीट' हा नारा दिला. प्रथम मातोश्रीवरुन सोमय्या यांची भेट नाकारली त्यानंतर शिवसेना आमदार सुनिल राऊत यांनी सोमय्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलं आहे. या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जाणारे प्रसाद लाड यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.

जागावाटपात ईशान्य मुंबई मतदारसंघ भाजपकडे असला तरी या मतदारसंघात शिवसेनेची ताकद अधिक आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मर्जीशिवाय येथे उमेदवार देता येणार नाही याची भाजपला देखील कल्पना आहे. शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी सोमय्या यांनी जोरदार प्रयत्न केले. पण मातोश्रीवरून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

Loading...


VIDEO : रावसाहेब दानवे पुन्हा चुकले! विंग कमांडर अभिनंदनबद्दल केलं 'हे' वक्तव्य


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 2, 2019 11:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...