मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेचं स्थान काय असणार?

मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेचं स्थान काय असणार?

शिवसेनेला नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात किती पदं मिळणार?

  • Share this:

मुंबई, 25 मे : लोकसभा निवडणुकीत जनतेनं पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या पारड्यात आपलं मत टाकलं. या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं. तर, NDAचं संख्याबळ हे 350च्या घरात गेलं. 30 एप्रिल रोजी नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळात कोण असणार? मित्र पक्षांना किती जागा असणार? यावर चर्चा सुरू झाली आहे. विशेषता जुना मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला 2014मध्ये अवघं एक मंत्रिपद मिळालं होतं. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात आणखी एक पद शिवसेनेला देण्यात येणार होतं. पण, मातोश्रीवरून गेलेल्या फोननंतर अनिल देसाई यांना विमानतळावरून माघारी परतावं लागलं होतं.

शिवसेनेनं वेळोवेळी आपली नाराजी उघड केली होती. राज्यात देखील दोन्ही पक्षांमध्ये सतत खटके उडत होते. पण, भाजपनं बदलत्या राजकीय स्थितीचा अंदाज घेत शिवसेनेशी जुळवून घेतलं. पण, NDA-2मध्ये शिवसेनेला किती मंत्रिपदं मिळणार हे पाहावं लागणार आहे.

विधानसभेमुळे शिवसेनेला होणार फायदा

राज्यात विधानसभेच्या निवडणुका या तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे शिवेसेनेला नाराज करणं भाजपला परवडणार नाही. सर्व गोष्टींचा विचार करता मोदी शिवसेनेला 2014पेक्षा जास्त मंत्रिपदं देतील अशी चर्चा आहे. NDAच्या घटकपक्षांच्या झालेल्या स्नेहभोजनामध्ये देखील त्याप्रकारचे संकेत देण्यात आले. त्यामुळे आता मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या कोणत्या खासदारांना संधी मिळणार हे पाहावं लागणार आहे.

शिवनेतेतून कुणाला संधी

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना पराभवाचा सामना करावा लागला. शिवाय, चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव - पाटील आणि आनंदराव आडसूळ यांचा देखील पराभव झाला. आढळराव - पाटील यांची खासदारकीची चौथी वेळ होती. त्यामुळे शिवसेनेतून मंत्रिपद कुणाला मिळणार हे पाहावं लागणार आहे.


पोलिसांची फिल्मी स्टाईलनं दादागिरी, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2019 11:50 AM IST

ताज्या बातम्या