निवडणुकीत पार्थचा पराभव जिव्हारी, माध्यमांशी बोलण्यास सुप्रिया सुळेंचा नकार

निवडणुकीत पार्थचा पराभव जिव्हारी, माध्यमांशी बोलण्यास सुप्रिया सुळेंचा नकार

'सध्या मनाची तयारी नसल्यामुळे माध्यमांशी बोलणार नाही.'

  • Share this:

पुणे 27 मे : बारामती लोकसभा मतदारसंघातून दीड लाख मतांनी निवडून आलेल्या सुप्रिया सुळे यांना भाचा पार्थ आणि पक्षाचा पराभव चांगलाच जिव्हारी लागलाय. निकालाला पाच दिवस उलटून गेले तरी सुप्रिया सुळे यांना माध्यमांशी बोलण्याचं धाडस होत नाहीये. निकालानंतर आज दिवसभर त्या पहिल्यांदाच सगळ्या कार्यकर्त्यांना समोर गेल्या. विधानसभा मतदारसंघनुसार त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या मात्र त्यांनी भाषणापूर्वी सुद्धा कुणाचाच मोबाईल ही सुरू राहणार नाही किंवा रेकॉर्डिंग करणार नाही असं जाहीर केलं. कार्यक्रम कव्हर करण्यासाठी माध्यमांनाही परवानगी नाकारण्यात आली आणि सध्या मनाची तयारी नसल्यामुळे बोलता येत नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय.

मुख्यमंत्री फडणवीस बिझी; शरद पवारांना CMOने अद्याप दिली नाही वेळ!

निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर सर्व राजकीय नेते दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. राज्य मंत्रिमंडळाने देखील यासंदर्भात मंत्री आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. राज्यातील मतदान संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दुष्काळी भागाचे दौरे केले होते. या दौऱ्यानंतर दुष्काळग्रस्त नागरिकांना मदत करण्यासंदर्भात शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळ मागितली आहे. पण मुख्यमंत्र्यांनी अद्याप त्यांना वेळ दिलेली नाही.

दुष्काळाबरोबरच शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. पण मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्या नियोजित कार्यक्रमात व्यस्त आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप पवारांना भेटीसाठी वेळ दिलेली नाही. दुष्काळ निवारणाबाबत शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटून सरसकट कर्जमाफीची विनंती करणार आहेत. केंद्रात काळजीवाहू सरकार असल्यानं नवीन सरकार स्थापन झाल्यावर सरसकट कर्जमाफीची विनंती करणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटलंय.

दुष्काळाबाबत चर्चा करण्यासाठी शरद पवार आज (सोमवारची) वेळ मुख्यमंत्र्यांकडून मागितली होती. या भेटीत ते सरसकट कर्जमाफी करण्याची करणार विनंती करणार आहेत. पण अद्याप CMOकडून त्यांना वेळ देण्यात आलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 27, 2019 05:36 PM IST

ताज्या बातम्या