News18 Lokmat

विखे पाटील यांच्या भक्कम साथीच्या जोरावर शिर्डीत शिवसेनेची विजयाची हॅटट्रिक

शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी मागील पाच वर्षांत केलेल्या विकास कामांची पोचपावती या लोकसभा निवडणुकीत मिळाली आहे. सोबतच शिर्डीमध्ये शिवसेनेने विजयाची हॅटट्रिक मारली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 09:36 PM IST

विखे पाटील यांच्या भक्कम साथीच्या जोरावर शिर्डीत शिवसेनेची विजयाची हॅटट्रिक

शिर्डी, 23 मे- शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी मागील पाच वर्षांत केलेल्या विकास कामांची पोचपावती या लोकसभा निवडणुकीत मिळाली आहे. सोबतच शिर्डीमध्ये शिवसेनेने विजयाची हॅटट्रिक मारली आहे. जनतेने काँग्रेसने मात्र भाऊसाहेब कांबळेंना नाकारत सदाशिव लोखंडे यांच्या बाजुने कौल दिला आहे. वंचित बहुजन आघाडीचे संजय सुखदान हेही इथे रिंगणात होते. परंतु त्यांनीही यश मिळवता आले नाही.

47 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निळवंडे धरणासाठी केलेलं काम, नगर जिल्ह्यातील धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याला केलेला विरोध, शिर्डी मतदारसंघात फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांची रोवलेली मुहूर्तमेढ आणि महत्त्वाचं म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांची मिळालेली भक्कम साथ ही सदाशिव लोखंडे यांच्या पथ्यावर पडली आहे

भाऊसाहेब कांबळे यांच्या पराभवाची कारणे-

-विखे पाटील यांनी सोडलेली साथ

- ससाणे गटानेही कांबळेना मदत न करण्याची घेतलेली भूमिका

Loading...

- आघाडीतील नेत्यांनी प्रामाणिकपणे न केलेलं काम

- मोदींच्या विचाराचा मतदारसंघावर असलेला प्रभाव

-आमदार असूनही प्रभाव नसलेलं भाषण

शिर्डी शिवसेनेचा गड..

शिर्डी लोकसभेची जागा 2009 आणि 2014 मध्ये शिवसेनेनेच जिंकली होती. यावेळी ही जागा अनुसूचित जातीजमातींसाठी राखीव होती. 1952 ते 2008 या काळात शिर्डी हा कोपरगाव मतदारसंघाचाच एक भाग होता. मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंर 2009 मध्ये इथे निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे जिंकून आले तर 2014 च्या निवडणुकीत सेनेचे सदाशिव लोखंडे यांचा विजय झाला.

2 वेळा सेनेची बाजी

शिर्डी लोकसभा मतदारंसघातल्या विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा दबदबा आहे पण याआधीच्या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये मात्र शिवसेनेने बाजी मारली. इथे 29 एप्रिलला चौथ्या टप्प्यात मतदान झालं. त्यात 63. 20 टक्के मतदानाची नोंद झाली.

मागच्या निवडणुकीत लोखंडेंचा विजय

मागच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सदाशिव लोखंडे यांचा विजय झाला. त्यांना 5 लाख 32 हजार 936 मतं मिळाली तर काँग्रेसचे भाऊसाहेब वाकचौरे यांना 3 लाख 33 हजार 14 मतं मिळाली.

शिवसेनेतून काँग्रेसमध्ये

भाऊसाहेब वाकचौरे हे 2009 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर लढून संसदेत गेले होते पण त्यानंतर त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 2014 ची निवडणूक ते हरले. या मतदारसंघात अगदी कमी म्हणजे 11 हजार 580 मतं मिळवून आप तिसऱ्या स्थानावर होती.

रामदास आठवले राज्यसभेत

रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले हेही 2009 च्या निवडणुकीत शिर्डीतून निवडणूक लढले पण त्यांचा पराभव झाला. यानंतर ते भाजप शिवसेना युतीमध्ये गेले आणि राज्यसभेचं सदस्यस्व घेऊन मोदी सरकारमध्ये मंत्री झाले. शिर्डी लोकसभा मतदारसंघात कोपरगाव आणि नेवासा या विधानसभा मतदारसंघांवर भाजपचा ताबा आहे. अकोल्यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत. संगमनेर, शिर्जी, श्रीरामपूर हे विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 09:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...