राजू शेट्टींना आघाडीची साथ महागात, स्वाभिमानीला फटका

गेल्या दोन निवडणुकांमध्ये स्वाभिमानीने जागा राखली होती मात्र यंदा त्यांना आघाडीची साथ महागात पडण्याची शक्यता दिसत आहे.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 01:10 PM IST

राजू शेट्टींना आघाडीची साथ महागात, स्वाभिमानीला फटका

मुंबई, 23 मे : हातकणंगले मतदारसंघातून सलग दोनवेळा खासदार झालेल्या स्वाभिमानी शेतकऱी संघटनेचे राजू शेट्टी तर कोल्हापूर राष्ट्रवादीचे धनंजय महाडीक पिछाडीवर आहेत. राजू शेट्टी गेल्या निवडणुकीत एनडीएचा घटक पक्ष म्हणून लढले होते. तर यंदा युपीएतून मैदानात उतरले होते. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या धैर्यशिल माने यांचे आव्हान होते. राजु शेट्टी 42 हजार 682 मतांनी पिछाडीवर आहेत. त्यांना 1 लाख 16 हजार 991 मते मिळाली असून शिवसेनेच्या धैर्यशील माने यांना 1 लाख 58 हजार 991 मते मिळाली आहेत.

सांगलीत भाजपचे संजय काका पाटील आघाडीवर असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील पिछाडीवर आहेत. वंचित बहुजन आघाडीचे गोपिचंद पाडळकर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. चौथ्या फेरीअखेर संजय काका पाटील यांना 97 हजार 540 मते मिळाली आहेत. तर विशाल पाटील 66 हजार 355 मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. वंचित बहुजन आघाडीचे गोपिचंद पाडळकर यांना 54 हजार 684 मते मिळाली आहेत.

गेल्या 2 निवडणुकांमध्ये स्वाभिमानीच्या राजू शेट्टींचा विजय

शेतकऱ्यांच्या मागण्यांचा अजेंडा घेऊन लढणाऱ्या राजू शेट्टींनी 2009 आणि 2014 च्या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता. त्यामुळे आता राजू शेट्टी पुन्हा विजयी होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींना 6 लाख 40 हजार 428 मतं मिळाली होती. त्याचवेळी काँग्रेसचे कलप्पा आवाडे यांना 4 लाख 62 हजार 618 मतं मिळाली. 2009 च्या निवडणुकीत राजू शेट्टी यांना मोठा विजय मिळाला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवेदिता मानेंचा पराभव केला होता.

राजकीय इतिहास

Loading...

हातकणंगलेच्या जागेवर एकेकाळी काँग्रेसचं वर्चस्व होतं. 1999 पर्यंत हा दबदबा कायम राहिला. पण त्यानंतर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्षाकडे गेली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यात शाहूवाडी, हातकणंगले आणि शिरोळ या जागा शिवसेनेकडे आहेत. इचलकरंजी आणि शिराळ्यामध्ये भाजपचे आमदार आहेत तर इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत.

शेतकरी संघटनेत काम

राजू शेट्टी या भागातले लोकप्रिय नेते आहेत.याआधी त्यांनी शरद जोशींच्या शेतकरी संघटनेमध्ये काम केलं. नंतर पहिल्यांदा त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकली. 2004 मध्ये ते विधानसभेत गेले. त्यानंतर 2009 मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना हा स्वतंत्र पक्ष त्यांनी स्थापन केला.

=============================================================================

SPECIAL REPORT : निवडणूक आयोगाचा विरोधी पक्षांना मोठा झटकाबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 01:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...