शिरुर निवडणूक निकाल 2019 LIVE : शिवसेनेच्या गडाला सुरूंग, अमोल कोल्हे विजयी

शिवाजीराव आढळराव याआधी 3 वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. अमोल कोल्हेंना उमेदवारी दिली होती.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 06:48 PM IST

शिरुर निवडणूक निकाल 2019 LIVE : शिवसेनेच्या गडाला सुरूंग, अमोल कोल्हे विजयी

शिरुर, 23 मे : लोकसभेच्या यावेळच्या निवडणुकीत शिवसेनेची मदार विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यावरच होती. शिवाजीराव आढळराव याआधी 3 वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. अमोल कोल्हेंना उमेदवारी दिली. त्यामुळे या दोघांमध्ये थेट लढत झाली.

या निवडणुकीच्या निकालात अमोल कोल्हे यांनी या निवडणुकीत विजयी आघाडी घेतली आहे.

शिरूर लोकसभा

अमोल कोल्हे-628051

शिवाजी आढळराव पाटील-567391

Loading...

अमोल कोल्हे यांची 60660 मतांनी आघाडी

शिरूरमधील राजकारण

शिरुर हा लोकसभा मतदारसंघ 2008 मध्ये अस्तित्वात आला. त्यानंतर 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेने विजय मिळवला. त्यामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना शिरुरचा गड राखणार का? याची चर्चा आहे.2014 च्या निवडणुकीत मोदी लाट होती. शिवसेनेने याही वेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांना तिकीट दिलं. त्यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जोरदार मताधिक्य मिळवत राष्ट्रवादीचे देवदत्त निकम यांचा पराभव केला. 2009 मध्येही शिवाजीराव आढळराव पाटील यांना 4 लाख 82 हजार 563 मतं मिळाली होती. त्यांनी राष्ट्रवादीच्या विलास लांडे यांचा पराभव केला होता. 2004 पासून खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव आपली यशस्वी कारकीर्द सुरूच ठेवणार का? हा प्रश्न विचारला जात होता.

राष्ट्रवादीचाही जोर

स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेमुळे लोकप्रिय असलेले कलाकार डॉ.अमोल कोल्हे यांनाही इथे मतदारांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. आधी शिवसेनेत असणाऱ्या अमोल कोल्हेंनी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

वेगवेगळ्या पक्षांचं वर्चस्व

शिरुर लोकसभा मतदारसंघात खेड, आळंदी, शिरुर, भोसरी, हडपसर, आंबेगाव आणि जुन्नर या विधानसभेच्या जागांवर वेगवेगळ्या पक्षांचं वर्चस्व आहे. या सगळ्या जागांवर राष्ट्रवादीनेही चांगलाच जोर लावला होता.

जुन्नर विधानसभा मतदारसंघात मनसे, आंबेगावमध्ये राष्ट्रवादी तर खेड आणि आळंदीच्या जागा शिवसेनेकडे आहेत. शिरुर आणि हडपसर भाजपकडे आहे आणि भोसरीमध्ये अपक्ष आमदार आहेत.

=================================================================================

VIDEO : सोलापुरात भीम आर्मीचा भाजपला इशारा, प्रकाश आंबेडकरांनी दिला 'हा' सल्लाबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 08:01 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...