सांगली लोकसभा निकाल 2019 : भाजपच्या संजयकाका पाटलांचा विजय निश्चित

सांगलीमध्ये भाजपने विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवलं आहे.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 06:14 PM IST

सांगली लोकसभा निकाल 2019 : भाजपच्या संजयकाका पाटलांचा विजय निश्चित

सांगली, 23 मे : सांगलीच्या लोकसभा मतदारसंघावर अनेक वर्षं काँग्रेसची मक्तेदारी होती पण 2014 च्या मोदी लाटेत भाजपने ही जागा काँग्रेसकडून खेचून आणली आणि पहिल्यांदा इथे विजय मिळवला होता. या निवडणुकीतही भाजपच्या संजय काका पाटील यांनी मोठी आघाडी घेतली. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला आहे.

चौदावी फेरी

संजयकाका पाटील(भाजप)-4,52533

विशाल पाटील(स्वाभीमानी शेतकरी संघटना)-3,09418

गोपीचंद पडळकर- (वंचित बहुजन आघाडी)-2,58172

Loading...

संजयकाका पाटील हे 1 लाख 43 हजार 115 मतांनी आघाडीवर आहेत.

वंचित बहुजन आघाडीची मतं निर्णायक

भाजपने या निवडणुकीत विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनाच पुन्हा एकदा रिंगणात उतरवलं आहे. काँग्रेसने स्वत:चा उमेदवार देण्यापेक्षा ही जागा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे विशाल पाटील हे संजय पाटील यांच्याविरुद्ध लढले.

सांगलीमध्ये बसपा आणि वंचित बहुजन आघाडीचेही उमेदवार आहेत. वंचित बहुजन आघाडीतर्फे गोपीचंद पडळकर रिंगणात होते. सांगलीच्या या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची मतं निर्णायक ठरणार आहेत,असं बोललं जातं.

प्रतीक पाटील यांनी सोडली काँग्रेसची साथ

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील हे 2009 मध्ये काँग्रेसकडून निवडून आले आणि केंद्रीय कोळसा राज्यमंत्री झाले. पण 2014 साली नरेंद्र मोदींनी इथे सभा घेतली, भाजपला चांगला विजय मिळाला आणि संजयकाका पाटील तिथून निवडून आले. प्रतीक पाटील यांचा पराभव झाला आणि सांगलीमधली काँग्रेसची सद्दी संपली.

या निवडणुकीत प्रतीक पाटील यांचे भाऊ विशाल पाटील हे रिंगणात आहेत. प्रतीक पाटील यांनी काँग्रेसशी नाळ तोडली असली तरी त्यांनी अजून पक्षाचा राजीनामा दिलेला नाही. ते काँग्रेससोबत नसले तरी भावाच्या पाठिशी मात्र खंबीरपणे उभे होते.

मागच्या निवडणुकीत भाजपचा विजय

सांगलीमधला मुकाबला काँग्रेस आणि भाजपमध्येच आहे. तरीही वंचित आघाडीची निर्णायक मतं कुणाला फायदा करून देतात यावरच भाजप आणि काँग्रेसचं इथलं यश अवलंबून आहे. मागच्या निवडणुकीत भाजपचे संजयकाका पाटील यांना 6 लाख 11 हजार 563 मतं मिळाली तर काँग्रेसचे प्रतीक पाटील यांना 3 लाख 72 हजार 271 मतं मिळाली. त्यामुळे संजयकाका पाटील यांचा दणदणीत विजय झाला.सांगली लोकसभा मतदारसंघात मिरज, सांगली, जत, खानापूर, पलूस कडेगाव, तासगाव कवठे महांकाळ या विधानसभा मतदारसंघ येतात.

===========================================================================

SPECIAL REPORT : निवडणूक आयोगाचा विरोधी पक्षांना मोठा झटका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 07:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...