लोकसभा निवडणूक निकाल 2019 : मतमोजणीला सुरुवात महाराष्ट्रात युतीचे उमेदवार आघाडीवर

Lok Sabha Election Result 2019 Live Updates लोकसभा निवडणुकीचे पहिले कल हाती यायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेचा भाजप युती आघाडीवर आहे.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 08:28 AM IST

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : मतमोजणीला सुरुवात महाराष्ट्रात युतीचे उमेदवार आघाडीवर

मुंबई, 23 मे : सतराव्या लोकसभेसाठी सुरू असलेल्या निवडणुकीचा अखेरचा मतमोजणीचा टप्पा सुरू झाला आहे. महाराष्ट्रात युतीच्या जागा जास्त असणार की आघाडीच्या... कोण पुढे, कोण मागे हे काही क्षणांत आणखी स्पष्ट होईल.

लोकसभेच्या 542 जागांसाठी 8040 उमेदवार रिंगणात आहेत. एक्झिट पोल प्रमाणे निकाल लागतील की वेगळं काही होईल? काँग्रेसला किती जागा मिळतील. महाआघाडीचं काय होणार? असे असंख्य प्रश्न विचारले जात आहेत. आज देशभरातील लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी 542 जागांची मतगणना होत आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत 542 लोकसभा मतदार संघांसाठी एकूण ७ टप्प्यांमध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक 68.11 टक्के इतके मतदान झाले. ही टक्केवारी 2014 मध्ये झालेल्या मतदानाहून 1.16 टक्क्यांनी अधिक आहे.

राज्यातल्या 48 लोकसभा मतदार संघांच्या मतमोजणीसाठी 38 ठिकाणी मतमोजणी केंद्रं स्थापन करण्यात आली आहेत. मतमोजणीसाठी सुमारे 1 लाख अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशात मतदानासाठी प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 5 व्हीव्हीपॅट यंत्रांमधील पावत्यांची पडताळणी करण्यात येणार आहे.

LIVE Lok Sabha Election Result 2019: या लिंकवर मिळतील निकालाचे ताजे अपडेट्स


निवडणूक आयोगाच्या https://ceo.maharashtra.gov.in  आणि https://results.eci.gov.in  संकेतस्थळावरही निकाल पाहण्यास मिळणार आहेत. त्याच बरोबर 1950 या टोल फ्री क्रमांकावर आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात नियंत्रणकक्ष स्थापन करण्यात आला असून  तिथेही 022-22040451 / 54 या क्रमांकावर माहिती मिळणार आहे.

Loading...

महाराष्ट्रात भाजप- शिवसेना युती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीमध्ये चुरस आहे. वंचित विकास आघाडीचा फॅक्टर कुठल्या मतदारसंघात किती काम करणार यावर युती- आघाडीचं गणिक घडणार की बिघडणार हे ठरणार आहे.


2014 मध्ये कशी होती परिस्थिती?


या वेळी वेगवेगळ्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात युतीला 36 ते 45 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. प्रत्यक्षात कुणाला किती जागा मिळणार हे काही वेळातच स्पष्ट होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 08:24 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...