S M L

पालघर शिवसेनेकडे; राजेंद्र गावित 84 हजार मतांनी विजयी

शिवसेनेचे राजेंद्र गावित हे पालघरमधून 84 हजार 600 मतांनी विजयी झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 03:00 PM IST

पालघर शिवसेनेकडे; राजेंद्र गावित 84 हजार मतांनी विजयी

पालघर, 23 मे : पालघरची जागा शिवसेनेनं पुन्हा आपल्याकडे मिळवली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित हे 84 हजार 600 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी बहुजन विकास आघाडीने बळीराम जाधव यांचा पराभव केला आहे.शिवसेना आणि भाजपच्या जागावाटपात पालघरची जागा कुणाला मिळणार यावरून बराच खल झाला. 2014च्या निवडणुकीत एकत्र लढलेले शिवसेना आणि भाजप 2018च्या पोटनिवडणुकीत मात्र आमनेसामने आले.

पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे इथे पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत भाजपचे राजेंद्र गावित विजयी झाले आणि शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा पराभव झाला. पण, पालघरच्या जागा वाटपावर तोडगा काढत पालघरची जागा शिवसेनेनं मिळवली.

पोटनिवडणुकीत सेनेचा पराभव


पालघरच्या पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाल्यामुळे या लोकसभा निवडणुकीत ही जागा कुणाकडे जाणार यावरून वाद होता. अखेर ही जागा शिवसेनेकडे आली पण भाजपमधून शिवसेनेत आलेले राजेंद्र गावित यांना इथून उमेदवारी देण्यात आली. पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीने बळीराम जाधव यांना यावेळी उमेदवारी दिली. बळीराम जाधव हे 2009 चे पालघरचे खासदार होते.


कोकणात शिवसेनेला दणका; रायगडमधून सुनिल तटकरे 21 हजार मतांनी विजयी

Loading...

मागच्या निवडणुकीत भाजपचा विजय

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार चिंतामण वनगा इथून निवडून आले. त्यांनी बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांचा पराभव केला होता.

2018 च्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांना 2 लाख 72 हजार 782 मतं मिळाली तर शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांना 2 लाख 43 हजार 838 मतं मिळाली.

पालघरमध्ये विजय कुणाचा ?

पालघर लोकसभा मतदारसंघात डहाणू आणि विक्रमगड हे विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहेत. पालघर शिवसेनेकडे आहे तर बोइसर, नालासोपारा आणि वसई बहुजन विकास आघाडीकडे आहे.त्यामुळे निवडणुकीत रंगत आली होती. अखेर शिवसेनेचे राजेंद्र गावित हे 84 हजार मतांनी विजयी झाले.


====================================================================================

VIDEO : 'राज ठाकरेंवर करमणूक कर लावला पाहिजे'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 23, 2019 02:27 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close