नाशिक निवडणूक निकाल 2019 LIVE : हेमंत गोडसे आघाडीवर भुजबळ पिछाडीवर

नाशिक निवडणूक निकाल 2019 LIVE : हेमंत गोडसे आघाडीवर भुजबळ पिछाडीवर

शिवसेनेचे हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ यांच्यात लढत होती. भुजबळ कुटुंबीयांसाठी ही अत्यंत प्रतिष्ठेची लढत होती.

  • Share this:

नाशिक, 23 मे : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नाशिकच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. इथे शिवसेनेचे हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ यांच्यात लढत होती. भुजबळ कुटुंबीयांसाठी ही अत्यंत प्रतिष्ठेची लढत होती.

पुन्हा लढत

समीर भुजबळ यांनी 2009 च्या लोकसभा निवडणुकीत हेमंत गोडसेंना हरवलं होतं. त्यावेळी हेमंत गोडसे मनसेमध्ये होते. त्यानंतर 2014 मध्ये हेमंत गोडसे युतीचे उमेदवार म्हणून निवडून आले आणि त्यांनी छगन भुजबळ यांचा पराभव केला.

मराठा समाजाची मतं निर्णायक

2014 च्या निवडणुकीत पुन्हा हेमंत गोडसे आणि समीर भुजबळ आमनेसामने आले. नाशिकमध्ये मराठा समाजाची मतंही निर्णायक होती. माजी आमदार माणिकराव कोकाटे यांची अपक्ष उमेदवारी आणि बहुजन वंचित आघाडीने ऐनवेळी उमेदवार दिल्यामुळे ही लढत चौरंगी बनली होती.

वंचित बहुजन आघाडी

निवडणुकीच्या आधी बहुजन वंचित आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळ यांच्याविरोधात उमेदवार देणार नाही, अशी घोषणा केली होती. पण समीर उमेदवार झाल्यामुळे त्यांनी पवन पवार यांना उमेदवारी दिली आणि आघाडीसमोर आव्हान उभं केलं. माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे ते अपक्ष लढले.

छगन भुजबळांचा पराभव

2014 च्या निवडणुकीत नाशिकमध्ये हेमंत गोडसेंचा विजय झाला. त्यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा दणदणीत पराभव केला होता. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार प्रदीप पवार तिसऱ्या स्थानावर होते.

चौथ्या टप्प्यात मतदान

नाशिकमध्ये चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं.भाजप शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी अशी ही अटीतटीची लढत होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 10:40 AM IST

ताज्या बातम्या