दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत विजयी; पराभवानंतर काय म्हणाले मिलिंद देवरा?

दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत विजयी झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 08:22 PM IST

दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत विजयी; पराभवानंतर काय म्हणाले मिलिंद देवरा?

मुंबई, 23 मे : लोकसभा निवडणुकांमध्ये NDAनं बाजी मारली. दक्षिण मुंबईमध्ये काँग्रेसचे मिलिंद देवरा विरुद्ध शिवसेनेचे अरविंद सावंत अशी लढत झाली होती. पण, या लढतीमध्ये अरविंद सावंत यांनी विजय मिळवला आहे. निकालानंतर मिलिंद देवरा यांनी पराभव मान्य केला असून यापुढे जोमानं काम करणार असल्याचं म्हटलं आहे.

2014 मध्ये सेना

2014 च्या निवडणुकीत अरविंद सावंत विरुद्ध मिलिंद देवरा अशीच लढत झाली होती. त्यावेळी मोदी लाटेमुळे अरविंद सावंत यांना जोरदार फायदा झाला आणि त्यांचा विजय झाला होता. दक्षिण मुंबई, उत्तर मुंबई यासोबतच उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबईमध्ये देखील शिवसेना - भाजपचे उमेदवार विजयी झाले.

राज ठाकरे फॅक्टर

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हाही मुंबईच्या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा बनला होता.राज ठाकरे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य करत भाजप सरकारवर जोरदार टीका करत होते.काळा चौकीच्या सभेत राज ठाकरेंनी शिवसेनेला मतदान करू नका, असंही आवाहन केलं होतं. पण, त्यानंतर देखील दक्षिण मुंबईच्या मतदारांनी शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांच्या पारड्यात मतं टाकली.

Loading...


VIDEO : उद्धव ठाकरेंनी 'लाव रे तो व्हिडिओ'ची उडवली खिल्ली, 'मातोश्री'वर एकच हास्यकल्लोळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 08:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...