लातूर निवडणूक निकाल 2019 LIVE : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजप पुन्हा एकदा जिंकणार का?

शेतकरी कामगार पक्षाचा अपवाद सोडला तर या जागेवर काँग्रेसचंच वर्चस्व होतं. 2009 मध्ये भाजपने काँग्रेसवर मात केली. 2014 मध्येही काँग्रेसला इथे हार मानावी लागली आणि लातूरमध्ये भाजपचं कमळ खुललं.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 09:53 AM IST

लातूर निवडणूक निकाल 2019 LIVE : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजप पुन्हा एकदा जिंकणार का?

लातूर, 23 मे : मराठवाड्यातली लातूरची जागा काँग्रेससाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा भाजपने जिंकली होती. भाजपचे डॉ. सुनील गायकवाड यांनी दत्तात्रय बनसोडे यांचा पराभव केला होता.

आधी काँग्रेसचं वर्चस्व

लातूरमध्ये 1962 मध्ये पहिल्यांदा निवडणूक झाली. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचा अपवाद सोडला तर या जागेवर काँग्रेसचंच वर्चस्व होतं. 2009 मध्ये भाजपने काँग्रेसवर मात केली. 2014 मध्येही काँग्रेसला इथे हार मानावी लागली आणि लातूरमध्ये भाजपचं कमळ खुललं.

मागच्या निवडणुकीत भाजपचा विजय

लातूर लोकसभा मतदारसंघात लातूर ग्रामीण, लातूर शहर, अहमदपूर, उदगीर, निलंगा आणि लोहा हे विधानसभा मतदारसंघ येतात. 2014 च्या निवडणुकीत डॉ. सुनील गायकवाड यांनी दत्तात्रय बनसोडेंना अडीच लाख मतांपेक्षा जास्त मतांनी हरवलं होतं.

Loading...

यावेळी लोकसभा निवडणुकासाठी लातूरमधून एकूण 10 उमेदवार लढले. भाजपने इथे सुधाकर तुकाराम यांना तिकिट दिलं होतं. काँग्रेसतर्फे मच्छिंद्र कामत हे निवडणूक लढले. बसपा आणि वंचित बहुजन आघाडीचाही इथे चांगला प्रभाव होता.

शिवराज पाटील 7 वेळा खासदार

लातूर लोकसभा मतदारसंघातून 7 वेळा शिवराज पाटील खासदार झाले. 2004 मध्ये मात्र त्यांचा पराभव झाला पण ते राज्यसभेच्या माध्यमातून संसदेत पोहोचले आणि मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री झाले. शिवराज पाटील 1980 ते 2004 या काळात 24 वर्षं संसदेत होते.

मागच्या वेळी युतीचा फायदा

गेल्यावर्षी मोदी लाटेचा फायदा घेत भाजपने लातूरमधून विजय मिळवला. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेना - भाजपची युती होती.

============================================================

महाराष्ट्राच्या 48 जागांपैकी शिवसेनेने 23 तर भाजपने 25 जागा लढवल्या. युती विरुद्ध आघाडीच्या या लढतीत वंचित बहुजन आघाडी, मनसे हे फॅक्टरही महत्त्वाचे होते.

VIDEO : ईव्हीएमवरून काँग्रेसच्या उमेदवारचा सुप्रीम कोर्टावर धक्कादायक आरोप


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 09:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...