हिंगोली निवडणूक निकाल 2019 LIVE : शिवसेनेचे हेमंत पाटील 68526 मतांनी पुढे

Lok Sabha Election Result 2019 Live Updates हिंगोली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे सुभाष वानखेडे यांनी निवडणूक लढवली तर शिवसेनेने हेमंत पाटील यांना रिंगणात उतरवलं होतं. हिंगोलीची मुख्य लढत या दोघांमध्येच आहे. मागच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी मोदी लाटेतही इथून विजय मिळवला होता.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 02:30 PM IST

हिंगोली निवडणूक निकाल 2019 LIVE : शिवसेनेचे हेमंत पाटील 68526 मतांनी पुढे

हिंगोली, 23 मे : हिंगोली लोकसभा मतदार संघात काँग्रेस-सेनेत काट्याची लढत आहे.  शिवसेनेने हेमंत पाटील यांनी 68526 मतांने आघाडी घेतली आहे. काँग्रेसतर्फे सुभाष वानखेडे हे रिंगणात उतरवले आहेत.

हिंगोली लोकसभा मतदार संघअपडेट

हेमंत पाटील- 141025 (शिवसेना)

सुभाष वानखेडे - 72499 (काँग्रेस)

मोहन राठोड -40892 (वंचित बहुजन )

Loading...

वेगवेगळ्या पक्षांचं वर्चस्व

हिंगोलीच्या जागेचा इतिहास पाहिला तर या जागेवर एखाद्या ठराविक पक्षाचा कब्जा कधीच नव्हता. इथे कधी शिवसेनेचा विजय झाला तर कधी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या ताब्यात ही जागा आली.

यावेळी शिवसेनेने हेमंत पाटील यांना तिकीट दिलं तर काँग्रेसने सेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या सुभाष वानखेडेंना रिंगणात उतरवलं. सुभाष वानखेडे हे 2009 मध्ये शिवसेनेचे खासदार झाले आणि नंतर ते काँग्रेसमध्ये आले.

2014 च्या निवडणुकीत काँग्रेसचा विजय

देशात मोदी लाट असताना मागच्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर राजीव सातव निवडून आले. त्यांना 4 लाख 67 हजार 397 मतं मिळाली तर शिवसेनेच्या सुभाष वानखेडेंना 4 लाख 65 हजार 765 मतं मिळाली. म्हणजे राजीव सातव केवळ 1600 मतांनी जिंकले.

2009 च्या निवडणुकीत सुभाष वानखेडेंचा विजय

2009 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांना 3 लाख 40 हजार 148 मतं मिळाली. त्यांनी राष्ट्रवादीच्या सूर्यकांत पाटील यांचा पराभव केला.

मतदारांचा कौल कुणाला ?

हिंगोली लोकसभा मतदारसंघात उमरखेड, हिंगोली या विधानसभा मतदारसंघात भाजप, किनवटमध्ये राष्ट्रवादी, हदगाव, वसमतमध्ये शिवसेना, कळमनुरीमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत. या सगळ्या मतदारसंघांत मतदारांनी काँग्रेसला कौल दिला की शिवसेनेला हे 23 मे ला कळेल.

हिंगोलीमध्ये 18 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात मतदान झालं. इथे 60.69 टक्के मतदानाची नोंद झाली.


VIDEO:आता 'लावा ना व्हिडिओ', मुनगंटीवारांचा राज ठाकरेंना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 02:20 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...