नक्षलग्रस्त गडचिरोली-चिमूरमध्ये भाजपच्या अशोक नेते यांचा विजय

गडचिरोलीमध्ये भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते यांचा दणदणीत विजय झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 11:49 PM IST

नक्षलग्रस्त गडचिरोली-चिमूरमध्ये भाजपच्या अशोक नेते यांचा विजय

गडचिरोली, 23 मे : गडचिरोलीमध्ये भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते यांचा दणदणीत विजय झाला आहे. नेते यांनी काँग्रेसच्या नामदेव उसेंडी यांचा निवडणूक लढवली होती. वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पक्षानेही येथे उमेदवार उतरवले होते. पण खरी लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच होती. दरम्यान, येथे वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसला जबरदस्त फटका बसला आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ आदिवासीबहुल आहे. हा भाग माओवादग्रस्तही आहे. या मतदारसंघात मतदान झाल्यानंतर 1 मे रोजी महाराष्ट्र दिनीच माओवाद्यांनी हिंसाचार घडवत कुरखेडामध्ये केलेल्या हल्ल्यात 15 जवान शहीद झाले तर गाडीचा चालकही मृत्युमुखी पडला होता.

काँग्रेसच्या नामदेव उसेंडी यांच्या पराभवाची कारणं

- काँग्रेस पक्षातली जिल्ह्यासह लोकसभा मतदारसंघात असलेली गटबाजी

- मतदारसंघात गेल्या पाच वर्षात जनसंपर्क नाही

- नियोजनबद्ध प्रचार नाही

Loading...

- भौगोलिकदृष्ट्या मोठा मतदारसंघ असल्याने मतदारापर्यंत पोहोचले नाहीत

वाचा :LIVE Lok Sabha Election Result 2019: भाजपचं स्वप्न सत्यात, महाराष्ट्र झाला काँग्रेसमुक्त!

विदर्भातील विजयी उमेदवार 

नागपूर लोकसभा मतदारसंघ - नितीन गडकरी(भाजप)

अकोला लोकसभा मतदारसंघ -  संजय धोत्रे (भाजप)

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ - अशोक नेते (भाजप)

वर्धा लोकसभा मतदारसंघ - रामदास तडस (भाजप)

भंडारा-गोंदियालोकसभा मतदारसंघ  - सुनील मेंढे (भाजप)

बुलडाणा लोकसभा मतदारसंघ - प्रतापराव जाधव (शिवसेना)

रामटेक लोकसभा मतदारसंघ - कृपाल तुमाने (शिवसेना)

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ - भावना गवळी (शिवसेना)

अमरावती लोकसभा मतदारसंघ  - नवनीत राणा (राष्ट्रवादी काँग्रेस)

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ  - सुरेश धानोरकर (काँग्रेस)

माओवाद्यांचा हल्ला

माओवाद्यांनी सी-60 कमांडोंच्या पथकावर हल्ला केला. या कमांडोंच्या वाहनाच्या मार्गात माओवाद्यांनी भूसुरुंग पेरून ठेवले होते. या स्फोटात या जवानांच्या गाडीचा अक्षरश: चुराडा झाला. अशा हल्ल्यांमुळे इथे सुरक्षेचं मोठं आव्हान असतं. माओवाद्यांची दहशत असूनही गडचिरोलीमध्ये नेहमीच चांगलं मतदान होतं. यावेळीही इथे मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गडचिरोली चिमूर मतदारसंघावर पहिल्यापासून काँग्रेसचं वर्चस्व होतं पण 1998 मध्ये भाजपला इथे पहिल्यांदा विजय मिळाला. यानंतर ही जागा कधी भाजपकडे होती तर कधी काँग्रेसकडे होती.

वाचा :BREAKING LIVE Lok Sabha Election Result 2019: राहुल गांधी अमेठीतून पराभूत

लोकसभा निवडणूक 2014चा निकाल

अशोक नेते, भाजप : 5,35,982 मतं

डॉ. नामदेव उसेंडी, काँग्रेस : 2,99,112 मतं

अशोक नेते यांचा 2,36,870 मतांनी विजय झाला होता.

लोकसभा निवडणूक 2014मध्ये भाजप उमेदवार अशोक नेते यांना 5 लाख 35 हजार982 मतं तर काँग्रेसच्या नामदेव उसेंडी यांना 2 लाख 99 हजार 112 मतं मिळाली होती. अशोक नेते यांनी नामदेव उसेंडी यांचा दणदणीत पराभव केला होता. गडचिरोली चिमूरमध्ये आमगाव, आरमोरी, अहेरी, गडचिरोली आणि चिमूर हे विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी ब्रह्मपुरी सोडलं तर बाकीच्या पाच जागांवर भाजपचं वर्चस्व आहे.

VIDEO : सेनेच्या वाघाला नमवणाऱ्या नवनीत राणांची पहिली UNCUT मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 11:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...