चंद्रापुरात भाजपला मोठा धक्का, काँग्रेसकडून केंद्रीय मंत्र्याचा पराभव

चंद्रापुरात भाजपला मोठा धक्का, काँग्रेसकडून केंद्रीय मंत्र्याचा पराभव

भाजपचे केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार हंसराज अहिर यांचा पराभव झाला आहे.

  • Share this:

चंद्रपूर, 23 मे : चंद्रपुरात भाजपला मोठा धक्का पत्करावा लागला आहे.  भाजपचे केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार हंसराज अहिर यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसचे उमेदवार सुरेश धानोरकर यांनी हंसराज अहिर यांचा दणदणीत पराभव केला आहे.वाचा : LIVE Lok Sabha Election Result 2019: भारताच्या उज्ज्वल भविष्याची गॅरेंटी - नरेंद्र मोदी

भाजपचा 15 वर्षं कब्जा

चंद्रपूर लोकसभेच्या जागेवर गेली 15 वर्षं भाजपचा कब्जा होता. याआधी हा काँग्रेसचा गड मानला जात होता. त्यामुळेच काँग्रेस पुन्हा एकदा ही जागा मिळवणार की भाजप आपली जागा राखणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण अखेर काँग्रेसला भाजपाचा पराभव करण्यास यश मिळालं. हंसराज अहिर यांच्या नेतृत्वाखालीच भाजपने 1996 मध्ये चंद्रपूरची जागा मिळवली होती. 2014 च्या निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या तुलनेत चंद्रपूरमध्ये यावेळी कमी मतदान झालं होतं.

वाचा :BREAKING LIVE Lok Sabha Election Result 2019: राहुल गांधी अमेठीतून पराभूत

लोकसभा निवडणूक 2014चा निकाल

हंसराज अहिर, भाजप : 5,08,049 मतं

संजय देवतळे, काँग्रेस : 2,71,780 मतं

हंसराज अहिर यांचा 2,36,269 मतांनी विजय

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार हंसराज अहिर यांनी काँग्रेसच्या संजय देवतळेंचा पराभव केला होता. हंसराज अहिर यांना त्यावेळी 5 लाख 8 हजार 49 मतं तर संजय देवतळे यांना 2 लाख 71 हजार 780 मतांवर समाधान मानावं लागलं होतं. या निवडणुकीत आपचे वामनराव चटप यांनाही 2 लाख 4 हजार 413 मतं मिळाली.

VIDEO : ईव्हीएमवरून काँग्रेसच्या उमेदवारचा सुप्रीम कोर्टावर धक्कादायक आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 12:01 PM IST

ताज्या बातम्या