बुलडाण्यात शिवसेनेनं गड राखला ! शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांची हॅटट्रिक

बुलडाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 11:46 PM IST

बुलडाण्यात शिवसेनेनं गड राखला ! शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांची हॅटट्रिक

बुलडाणा, 23 मे : बुलडाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. जाधव यांनी काँग्रेसने डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा दणदणीत पराभव केला आहे. येथे युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव, आघाडीचे उमेदवार डॉ.राजेंद्र शिंगणे आणि वंचित बहुजन आघाडीचे बळीराम सिरस्कार यांच्यात लढत होती. प्रतापराव जाधव यांना ही निवडणूक कठीण जाईल, असं चित्र दिसत होतं. पण अखेर मोदी त्सुनामीमध्ये जाधव यांना फायदा झाल्याचं जाणकारांचं मत आहे. जाधव यांची विजयाची ही हॅटट्रिक आहे.
Loading...


विदर्भातील विजयी उमेदवार 

नागपूर लोकसभा मतदारसंघ - नितीन गडकरी(भाजप)

अकोला लोकसभा मतदारसंघ -  संजय धोत्रे (भाजप)

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ - अशोक नेते (भाजप)

वर्धा लोकसभा मतदारसंघ - रामदास तडस (भाजप)

भंडारा-गोंदियालोकसभा मतदारसंघ  - सुनील मेंढे (भाजप)

बुलडाणा लोकसभा मतदारसंघ - प्रतापराव जाधव (शिवसेना)

रामटेक लोकसभा मतदारसंघ - कृपाल तुमाने (शिवसेना)

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ - भावना गवळी (शिवसेना)

अमरावती लोकसभा मतदारसंघ  - नवनीत राणा (राष्ट्रवादी काँग्रेस)

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ  - सुरेश धानोरकर (काँग्रेस)

वाचा :ठाण्यात पुन्हा एकदा भगवा फडकला; राजन विचारे विक्रमी मतांनी विजयी

1996 पासून आतापर्यंत ही जागा शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचे आनंदराव अडसूळ इथून सलग काही वर्षं खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2009 मध्ये प्रतापराव जाधव हे सेनेतर्फे रिंगणात उतरले. 2009 आणि 2014 मध्ये या जागेवर त्यांनीच वर्चस्व राखलं. 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी बुलडाण्यात दुसऱ्या टप्प्यात मतदान झालं. इथे 62.50 टक्के मतदानाची नोंद झाली.

वाचा :VIDEO : पराभवानंतर अशोक चव्हाणांचा वंचित आघाडीवर गंभीर आरोप

लोकसभा निवडणूक 2014चा निकाल

प्रतापराव जाधव, शिवसेना : 5,09,145 मतं

कृष्णाराव इंगळे, काँग्रेस : 3,49,566 मतं

प्रतापराव जाधव यांचा 1,59,579मतांनी विजय

2014 च्या निवडणुकीत बुलडाण्यामध्ये भाजप-शिवसेना युतीचा विजय झाला आणि प्रतापराव जाधव खासदार झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कृष्णराव इंगळे यांचा दणदणीत पराभव केला. जाधव यांना 5 लाख 9 हजार 145 मतं मिळाली. कृष्णराव इंगळे यांना 3 लाख 49 हजार 566 मतं मिळाली.

बुलडाणा लोकसभा मतदारसंघात बुलडाणा आणि चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा कब्जा आहे. सिंदखेड राजा आणि मेहकरमध्ये शिवसेना आहे तर खामगाव आणि जळगाव जामोद हे विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहेत.

VIDEO : सेनेच्या वाघाला नमवणाऱ्या नवनीत राणांची पहिली UNCUT मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 01:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...