S M L

भिवंडीत देखील कमळ फुललं; कपिल पाटील विजयी

भिवंडीमध्ये भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील विजयी झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 08:30 PM IST

भिवंडीत देखील कमळ फुललं; कपिल पाटील विजयी

भिवंडी, 23 मे : भिवंडीमध्ये भाजपने विद्यमान खासदार कपिल पाटील यांनाच रिंगणात उतरवलं होतं. त्यांना काँग्रेसच्या सुरेश टावरे यांनी आव्हान दिलं होतं. या दोन उमेदवारांमध्ये कोण बाजी मारणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. पण, भिवंडीत दुसऱ्यांदा कमळ फुललं असून कपिल पाटील यांनी बाजी मारली आहे. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने डॉ . अरुण सावंत यांना उमेदवारी दिली. तर बसपाने ऐनवेळी डॉ. नुरुद्दीन अन्सारी यांची उमेदवारी घोषित केली होती. त्यानंतर देखील कपिल पाटील यांनी बाजी मारली.

मागच्या निवडणुकीत भाजपचा विजय

मागच्या निवडणुकीत भाजपचे कपिल पाटील यांना 4 लाख 11 हजार 70 मतं मिळाली होती. काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांना 3 लाख 1 हजार 620 मतं मिळाली. मनसेचे सुरेश म्हात्रे इथे तिसऱ्या स्थानावर होते. त्यांना 93 हजार 647 मतं मिळाली होती.


भिवंडी लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघांची स्थिती पाहिली तर या सगळ्या जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा दबदबा होता. 2014च्या निवडणुकीत भाजपला इथे विजय मिळाला होता. विधानसभा निवडणुकीत भिवंडी ग्रामीण आणि भिवंडी पूर्व मध्ये सेनेला ताबा मिळाला. शहापूर विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा ताबा आहे.

राहुल गांधींवर खटला

याआधी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी संघाबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे इथली निवडणूक गाजली होती. महात्मा गांधींच्या हत्येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते. याप्रकरणी भिवंडीचे संघाचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.

Loading...

या निवडणुकीत मात्र राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकही सभा भिवंडीत झाली नाही. भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप या दोन पक्षांमध्येच तुल्यबळ लढत पाहायला मिळाली.


VIDEO : उद्धव ठाकरेंनी 'लाव रे तो व्हिडिओ'ची उडवली खिल्ली, 'मातोश्री'वर एकच हास्यकल्लोळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 23, 2019 08:30 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close