भंडारा-गोंदियामध्ये भाजपचीच सरशी, सुनील मेंढेंनी राखली जागा

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपच्या सुनील मेंढे यांनी राखली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 11:01 PM IST

भंडारा-गोंदियामध्ये भाजपचीच सरशी, सुनील मेंढेंनी राखली जागा

भंडारा, 18 मे :  भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपच्या सुनील मेंढे यांनी राखली आहे. सुनील मेंढे यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांचा पराभव केला. या जागेवरील निवडणूक भाजप तसंच राष्ट्रवादी काँग्रेससाठीही प्रतिष्ठेची ठरली होती. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढलेल्या नाना पटोले यांचा विजय झाला होता. त्यांनी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. नाना पटोलेंना 6 लाख 6 हजार 129 मतं तर प्रफुल्ल पटेल यांना 4 लाख 56 हजार 875 मतं मिळाली होती. पण पंतप्रधान मोदींवर जाहीर नाराजी व्यक्त करत पटोले यांनी काँग्रेसला साथ दिली. यामुळे या जागेवर पुन्हा पोटनिवडणूक घेण्यात आली होती.

वाचा : भाजपच्या ऐतिहासिक विजयावर संघाने दिली ही प्रतिक्रिया
वाचा :VIDEO : आमच्यासाठी राज्यघटना सर्वोच्च, विजयानंतर मोदींचं UNCUT भाषण

विदर्भातील विजयी उमेदवार 

नागपूर लोकसभा मतदारसंघ - नितीन गडकरी(भाजप)

अकोला लोकसभा मतदारसंघ -  संजय धोत्रे (भाजप)

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ - अशोक नेते (भाजप)

वर्धा लोकसभा मतदारसंघ - रामदास तडस (भाजप)

भंडारा-गोंदियालोकसभा मतदारसंघ  - सुनील मेंढे (भाजप)

बुलडाणा लोकसभा मतदारसंघ - प्रतापराव जाधव (शिवसेना)

रामटेक लोकसभा मतदारसंघ - कृपाल तुमाने (शिवसेना)

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ - भावना गवळी (शिवसेना)

अमरावती लोकसभा मतदारसंघ  - नवनीत राणा (राष्ट्रवादी काँग्रेस)

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ  - सुरेश धानोरकर (काँग्रेस)

नाना पटोलेंचा राजीनामा

लोकसभा निवडणूक2014मध्ये भंडारा गोंदियामध्ये नाना पटोलेंचा विजय झाला असला तरी ही जागा भाजपकडे फार दिवस राहिली नाही. भाजपवर नाराज झालेल्या नाना पटोलेंनी राजीनामा दिला आणि त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर इथे पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकरराव कुकडे यांनी भाजपच्या हेमंत पटले यांचा पराभव केला.

वाचा : निवडणूक निकालानंतर आता 'हे' शेअर्स वधारणार, भरपूर पैसे मिळवण्याची संधी

गडकरींविरोधात लढत

यावेळी नाना पटोले यांनी काँग्रेसच्या तिकिटावर नागपूरमधून नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवली. पण नितीन गडकरींच्या करिश्म्यापुढे पटोले यांचं आव्हान  फिकं पडलं. जनतेनं नितीन गडकरींच्याच गळ्यात विजयाची माळ घातली.

वाचा :VIDEO : जुनी जखम भरून निघाली, सुजय विखेंचा पवारांना सणसणीत टोला

प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी प्रतिष्ठेची जागा

ही जागा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती, पण त्यांनी इथून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.  भंडारा गोंदियामध्ये यावेळी 68.27 टक्के मतदान झालं. या मतदारसंघातले 3 विधानसभा मतदारसंघ भंडाऱ्यामध्ये आणि 3 मतदारसंघ गोंदियामध्ये येतात. तुमसर भंडारा, साकोली, अर्जुनी मोरगाव, तिरोडा इथे भाजपचे आमदार आहेत. गोंदियामध्ये काँग्रेसचं वर्चस्व आहे.

VIDEO : सेनेच्या वाघाला नमवणाऱ्या नवनीत राणांची पहिली UNCUT मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 09:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...