अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना धक्का, भाजपच्या संजय धोत्रेंचा विजयी चौकार

अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना धक्का, भाजपच्या संजय धोत्रेंचा विजयी चौकार

अकोला लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकरांना धक्का

  • Share this:

अकोला, 16 मे : अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांनी विजयाचा चौकार लगावला आहे. तर या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का बसला आहे. या मतदारसंघात एक अपवाद वगळता गेल्या 30 वर्षांपासून भाजपचं वर्चस्व आहे. यावेळीही भाजपने विद्यमान खासदार संजय धोत्रे यांनाच उमेदवारी दिली तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही इथून निवडणूक लढवली. पण 2014च्या निवडणुकीप्रमाणे त्यांना लोकसभा निवडणूक 2019मध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. पण वंचित बहुजन आघाडीचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मात्र प्रचंड प्रमाणात बसल्याचं दिसत आहे.


वाचा : Analysis : अकोल्यात या कारणांमुळे चालला नाही 'वंचित फॅक्टर'


वाचा :VIDEO : जनादेशानं घराणेशाही नष्ट केली, अमित शहांचं UNCUT भाषण

विदर्भातील विजयी उमेदवार 

नागपूर लोकसभा मतदारसंघ - नितीन गडकरी(भाजप)

अकोला लोकसभा मतदारसंघ -  संजय धोत्रे (भाजप)

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ - अशोक नेते (भाजप)

वर्धा लोकसभा मतदारसंघ - रामदास तडस (भाजप)

भंडारा-गोंदियालोकसभा मतदारसंघ  - सुनील मेंढे (भाजप)

बुलडाणा लोकसभा मतदारसंघ - प्रतापराव जाधव (शिवसेना)

रामटेक लोकसभा मतदारसंघ - कृपाल तुमाने (शिवसेना)

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ - भावना गवळी (शिवसेना)

अमरावती लोकसभा मतदारसंघ  - नवनीत राणा (राष्ट्रवादी काँग्रेस)

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ  - सुरेश धानोरकर (काँग्रेस)

मागच्या निवडणुकीत भाजपचा विजय

मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजय धोत्रे यांना 4 लाख 56 हजार 472 मतं तर काँग्रेसचे हिदायत पटेल यांना 2 लाख 53 हजार 356 मतं मिळाली. भारिपचे प्रकाश आंबेडकर यावेळी तिसऱ्या स्थानावर होते.

वाचा :VIDEO : आमच्यासाठी राज्यघटना सर्वोच्च, विजयानंतर मोदींचं UNCUT भाषण

लोकसभा निवडणूक 2014चा निकाल 

संजय धोत्रे, भाजप : 4,56,472 मतं

हिदायत पटेल, काँग्रेस : 2,53,356 मतं

संजय धोत्रे यांचा 2,03,116 मतांनी विजय

आता भाजपसमोर आव्हान

यावेळी मात्र प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने इथे चांगलंच आव्हान निर्माण केलं आहे. 1999 मध्ये प्रकाश आंबेडकर आणि मखराम पवार यांनी भारिपचा प्रयोग यशस्वी केला होता. त्यावेळी प्रकाश आंबेडकरांनी मिळवलेला विजय चांगलाच गाजला होता. त्याचा अकोला पॅटर्न म्हणूनही उल्लेख केला गेला. मात्र नंतर तो प्रयोग यशस्वी होऊ शकला नाही.

2014मध्ये संजय धोत्रेंची हॅटट्रिक

अकोला लोकसभा मतदारसंघात अकोला जिल्ह्यातल्या 5 आणि वाशिम जिल्ह्यातल्या एका विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. अकोल्यामध्ये भाजपच्या संजय धोत्रे यांनी 2004, 2009 आणि 2014 च्या निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता. त्याआधी भारिप बहुजन महासंघातर्फे प्रकाश आंबेडकर 1999 मध्ये निवडून आले होते. अकोल्यामध्ये अकोट, बालापूर, अकोला पश्चिमस, अकोला पूर्व, मूर्तिजापूर आणि रिसोड हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात.

वाचा : काँग्रेसच्या ठाकरेंना शिवसेनेचा 'पंच', भावना गवळींचा दणदणीत विजय

VIDEO : सेनेच्या वाघाला नमवणाऱ्या नवनीत राणांची पहिली UNCUT मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 10:35 AM IST

ताज्या बातम्या