औरंगाबादमध्ये पुन्हा चित्र पालटलं, वंचित आणि शिवसेनेमध्ये मोठी रस्सीखेच

औरंगाबादमध्ये पुन्हा चित्र पालटलं, वंचित आणि शिवसेनेमध्ये मोठी रस्सीखेच

शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यंदा पिछाडीवर पडले आहेत. खैरे हे पहिल्या फेरीत आघाडीवर होते.

  • Share this:

औरंगाबाद, 23 मे : औरंगाबादमध्ये औरंगाबादची लोकसभेची जागा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. पण यावेळी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यंदा पिछाडीवर पडले होते. खैरे हे पहिल्या फेरीत आघाडीवर होते. त्यानंतर आता एमआयएमचे उमेदवार  इम्तियाज जलील हे आघाडी घेतली. पण आता पुन्हा एकदा खैरेंनी आघाडी घेतली आहे. इथं हर्षवर्धन जाधव यांनीही मोठी लढत दिली. हर्षवर्धन जाधव हे भाजपाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.

शिवसेनेचे चंद्रकांत खैरे 4566 मतांनी पुढे आहेत. मात्र विसाव्या फेरीपर्यंत जलील यांनी आघाडी घेतली होती.

औरंगाबाद 20 वी फेरी

इम्तियाज जलिल- 322177

चंद्रकांत खैरे- 317090

हर्षवर्धन जाधव- 221738

चंद्रकांत खैरेंसमोर मोठं आव्हान

खैरे चार वेळा खासदार झाले आहेत. यावेळी मात्र काँग्रेसचे सुभाष झांबड आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरेंसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळेच औरंगाबादमध्ये यावेळी तिरंगी लढत आहे.

मागच्या निवडणुकीत खैरेंचा विजय

2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसचे उमेदवार सुरेश पाटील यांचा पराभव केला होता. चंद्रकांत खैरे यांना 5 लाख 20 हजार 902 मतं मिळाली तर सुरेश पाटील यांना 3 लाख 58 हजार 902 मतं होती.

अनेक वर्षं सेनेचं वर्चस्व

1998 ची लोकसभा निवडणूक सोडली तर शिवसेना इथे 1989 पासून 2014 पर्यंतच्या निवडणुकांमध्ये आपलं वर्चस्व राखून आहे.

मागच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे भाजप शिवसेना युतीने काँग्रेसवर जोरदार मात केली. आताही शिवसेना - भाजपची युती असली तरी मतदार सेनेला कौल देतात का हे पाहावं लागेल.

औरंगाबादमध्ये MIM फॅक्टर

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघांत मराठा समुदायाचं वर्चस्व आहे. कन्नड, औरंगाबाद पश्चिम या विधानसभा मतदारसंघांवर शिवसेनेचा ताबा आहे. औरंगाबाद विधानसभेची जागा मजलिस - ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच MIM चा ताबा आहे. औरंगाबाद पूर्व आणि गंगापूरमध्ये भाजपचं वर्चस्व आहे.वैजापूर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा कब्जा आहे.


VIDEO : पंकजांनी घेतलं आपल्या लाडक्या बहिणीला उचलून!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 05:37 PM IST

ताज्या बातम्या